इंधन दरवाढीचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.Yuvasena protests central government’s fuel price hike in Pune; Bicycle rally with saffron flags
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्याच्या सारसबाग येथे रविवारी सकाळ पासून भगवे झेंडे लावलेल्या सायकली घेऊन भगवे उपरणे घातलेले युवा सेनेचे शेकडो शिवसैनिक जमा झाले होते. इंधन दरवाढीचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली.
केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढी विरोधात ही युवा सायकल रॅली काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ तातडीने कमी करण्यात यावी, अशी मागाणी यावेळी करण्यात आली.यावेळी युवासेना पुणे शहर पदाधिकारी दशरथ खिरीड, राम थरकुडे, चेतन चव्हाण, निरंजन दाभेकर, सनी गवते, श्रावण झगडे, विकास बधे, मयूर पवार आदी उपस्थित होते.
सारसबागेकडून सिलाई चौक, शनिपार, अप्पा बळवंत चौक येथून उजवीकडे वळून फरासखाना, दगडूशेठ मंदिर, समाधान चौक, पुन्हा उजवीकडे वळून लक्ष्मीरोड येथून खंडूजी बाबा चौक या मार्गाने सायकल रॅली काढण्यात आली.
युवा सेनेचे विद्यापीठ कक्ष अध्यक्ष कुणाल धनवडे म्हणाले की , इंधन दरवाढीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. यामुळे केंद्र सरकारने ही दरवाढ रोखण्यासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App