वृत्तसंस्था
नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या घरावर एक तरुणीने दगड मारल्याची घटना नांदेमध्ये घडली. Young woman throws stones at Minister Ashok Chavan house in Nanded
अशोक चव्हाण यांच्या घराबाहेरील पोलिस चौकी आहे. तेथून तिला चव्हाण यांच्या घरात जाण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे तिने दगड फेकून मारले आहेत. एक ३४ वर्षांची महिला अशोक चव्हाण यांच्या घराजवळ आणि त्यांना भेटण्याचा आग्रह चौकीजवळ धरू लागली, अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी अनंत नाटुरे यांनी दिली.
चौकीवर पाहऱ्यावर असलेल्या पोलिसाने अशोक चव्हाण घरी नाहीत, असे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या महिलेने परत जाताना घराच्या दिशेने दगड फेकले. या प्रकरणी तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तिची चौकशी पोलिसांनी केली. मात्र तिला अटक केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App