वृत्तसंस्था
पुणे : पुण्याच्या जीवनवाहिनी असलेल्या मुळा आणि मुठा नद्या गटारगंगा का बनल्या आहेत ? असा सवाल करून पुणे- पिंपरी-चिंचवड महापलिकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने झापले आहे. सांडपाण्यातून अन्य कारणामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणावरून आणि दूषित पाणीपूरवठ्यावरून सलग आठवी नोटीस बजावली आहे. Why did a Mula – Mutha rivers become gutters; Pollution Control Board slaps Pune-Pimpri-Chinchwad Municipal Corporation; Eighth notice issued on sewage pollution
पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापलिकांनी दूषित पाणीपुरवठा केला म्हणून त्यांना नोटीस बजावली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी संजय जगताप यांनी दिली. जलशुद्धीकरणासाठी अर्थसंकल्पातील २५ टक्के तरतूद खर्च करणे अपेक्षित आहे. पण, दोन्ही पालिकांनी पावले उचलली नाहीत.
नद्यांचे प्रदूषणाबाबत पुणे महापालिकेला सलग आठव्यांदा नोटीस बजावली आहे. अशा नोटीस गेल्या चार वर्षात बजवल्या असून वर्षातील ही दुसरी नोटीस आहे. हरित लवादाने प्रदूषण प्रकरणी ८ कोटींचा दंडही ठोठावला होता. नदीकाठच प्रदूषण तातडीने थांबवा, असा आदेश दिला होता. पण, महापालिकेने सिंहगड रस्त्यावरील प्रकल्पातू मुठा नदीत कचरा टाकण्याचे काम सुरूच ठेवले आहे. तेथे कचरा प्रकल्प सुरु असल्याने नदी प्रदूषण सुरूच आहे. प्रदूषणाच्या मुद्यावर आवाज उठविल्यानंतर प्रदूषण मंडळाने पालिकेला नोटीस काढली होती.
अभियंता प्रमोद उंडे म्हणाले. महापालिकेकडे सांडपाणी शुद्धीकरणाची अपेक्षित व्यवस्था आणि पर्याप्त यंत्रणा नसल्याने सांडपाणी नदीत जात आहे. त्यामुळे नोटीस बजावली आहे. या नोटीसीला आम्ही उत्तर देणार आहोत.
मुळा- मुठेची अवस्था बिकटच
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App