येरवडा कारागृहात बंदी असलेल्या एका कैद्याची सिगारेटची राख १५ दिवसांपूर्वी डाेळयात गेल्याचे जुन्या भांडणाचे कारणावरुन दाेन कैद्यांनी एका कैद्याला दगडाने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. Yerwada jail prisoners conflict,case registered in yerwada police station
विशेष प्रतिनिधी
पुणे : येरवडा कारागृहात बंदी असलेल्या एका कैद्याची सिगारेटची राख १५ दिवसांपूर्वी डाेळयात गेल्याचे जुन्या भांडणाचे कारणावरुन दाेन कैद्यांनी एका कैद्याला दगडाने मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी राकेश ऊर्फ राख्या जाॅनी यकट व सुरेश बळीराम दयाळु (दाेघे रा.येरवडा कारागृह,पुणे) यांचेवर येरवडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलीसांकडे आराेपीं विराेधात अमाेल कालिदास लगस (२२) याने तक्रार दिली आहे. सदर तक्रारदार व दाेन आराेपी हे न्यायबंदी असून त्यांच्या केसची सुनावणी न्यायालयात सध्या सुरु आहे. तक्रारदार अमाेल लगस हा रेकाॅडवरील गुन्हेगार असून २८ एप्रिल राेजी येरवडा मध्यवर्ती कारागृहात सर्कल नं ३ बॅरेक क्रमांक ७ येथे ताे हाेता. त्यावेळी १५ दिवसांपूर्वी अमाेल लगस व राकेश यकट या आराेपीची सिगारेटची राख डाेळयात गेल्याचे जुन्या भांडणाचे कारणावरुन संबंधित आराेपींनी लगस याच्या डाेक्याच्या उजव्या बाजूस दगडाने मारहाण करुन त्यास जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच, कारागृह पाेलीसांनी संबंधित भांडणे साेडवली आणि यासंर्दभात येरवडा पाेलीस ठाण्यात जखमी कैद्याने दाेन जणां विराेधात तक्रार दाखल केली आहे. येरवडा पाेलीस याबाबत पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App