समाजनिष्ठ जीवन ध्येयातून डॉ. आंबेडकरांचे विश्वकल्याण कार्य; नाशिकच्या आयुर्वेद सेवा संघ महाविद्यालयात आदरांजली!!

प्रतिनिधी

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे भारतात होऊन गेलेले सर्व महापुरुष हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नसून ते संपूर्ण देशाचे – जगाचे असतात, असे गौरवोद्गार रा.स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी काढले. आयुर्वेद सेवा संघ संचलित आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर डॉ आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.With the goal of social life, Dr. Ambedkar’s work for world welfare

बाबासाहेबांवर घरातूनच धार्मिक संस्कार झाले होते. अत्यंत चांगल्या संस्कारातील कुटुंबातून आलेले असून व शैक्षणिक विद्वत्ता प्रचंड असून देखील त्यांना अस्पृश्य असण्याचे अनेक आघात सोसावे लागले. ज्ञानलालसा हा त्यांचा आयुष्यातील कायमचा गुण होता. शालेय वयात संस्कृत शिक्षणाची संधी नाकारल्यावर देखील ते पुढे जिद्दीने संस्कृत शिकले.



– अस्पृश्यता निवारण हेच जीवनध्येय

अस्पृश्यता निर्मूलनाचे त्यांच्या समकालीन कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी यांनी केले. तथापि असे प्रयत्न हे सहाय्यकारी असतात.परंतु ते अस्पृश्य समाजाला स्वावलंबी करू शकणार नाही या हेतूने बाबासाहेबांनी स्वतंत्रपणे चळवळ चालवली. अस्पृश्यता निवारण हेच आपले जीवनध्येय त्यांनी निश्चित केले होते. हे जीवनध्येय व्यक्तिनिष्ठ नसून समाजनिष्ठ होते. या संघर्षासाठी त्यांनी वैचारिक आणि लोकशक्तीचे सामर्थ्य उभे केले. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह आढि श्रीकाळाराम मंदिर सत्याग्रह याचे वर्णन करून त्यांनी पुढे सांगितले की बाबासाहेबांना यातून समतेचे तत्व स्थापित करायचे होते. चवदार तळ्याचा सत्याग्रहातील जाहीरनाम्यातील समानतेच्या जन्मसिद्ध अधिकाराचा आग्रह पुढे संविधानातदेखील आग्रह धरलेला दिसतो. कायदा करतांना सर्व प्रजेचे प्रतिनिधित्व सारखे मुद्दे हे पुढे संविधानात प्रतिबिंबित झालेले दिसतात असे ते म्हणाले.

– संविधानाबद्दल बाबासाहेबांचा इशारा

भारतीय संविधानातील स्वातंत्र्य,समता व बंधुता ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नसून ती भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहेत असे बाबासाहेबांचे प्रतिपादन होते. घटना समितीतील भाषणात कपटी रहिवाशांमुळे भारताचे स्वातंत्र्य गमावल्याचा इतिहास असून त्याची पुनरावृत्ती होऊ नये, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. जातीभेद आणि धर्मभेद हे देशाचे शत्रू असून राजकीय पक्षांच्या मतभेदांमुळे त्यात भर पडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

संस्थेचे उपाध्यक्ष वैद्य आशुतोष यार्दी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. धन्वंतरी स्तवन प्रा. वर्षा साधले, परिचय ओंकार जाधव , आभारप्रदर्शन तुषार पाटील आणि सूत्रसंचालन निशिगंधा अभंग यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. विनय सोनांबेकर आणि उपप्राचार्य डॉ. लक्ष्मीकांत जोशी हे उपस्थित होते.

With the goal of social life, Dr. Ambedkar’s work for world welfare

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात