एकीकडे राज्य सरकार वीज विकतं आणि वीज नाही म्हणतं हे चुकीचं आहे, असा टोला लगावत केंद्रानं कोळशाचा पुरवठा थांबवला नाही.Will Diwali go dark due to coal shortage ?, Minister Danve said – ‘Don’t worry, everything is planned!’
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिवाळीसण अंधारात जाण्याच्या भीतीची शक्यता फेटाळून लावली आहे.तसेच कोणतंही लोडशेडिंग होणार नाही.केंद्र सरकार वेळ पडली तर सेंट्रल ग्रील्डमधून वीज देणार पण राज्यावर अंधाराचं सावट येऊ देणार नाही. सगळं नियोजन झालं असल्याचं सांगत राज्यातील जनतेने निश्चित रहावं, असं देखील दानवे म्हणाले.ते आज पुण्यात बोलत होते.
एकीकडे राज्य सरकार वीज विकतं आणि वीज नाही म्हणतं हे चुकीचं आहे, असा टोला लगावत केंद्रानं कोळशाचा पुरवठा थांबवला नाही. राज्य सरकारने कोळशाचा साठ केला नाही म्हणून कोळशाची टंचाई झाली, असं म्हणत त्यांनी पुन्हा राज्य सरकारवर खापर फोडलं.
पावसाळ्यात खदाणीत पाणी साचने किंवा कोळसा भिजण्याची अडचण होते, त्यामुळे राज्यांना कोळसा उचलण्याच्या केंद्राने सूचना दिल्या होत्या. पण, पावसाळ्यापूर्वी राज्यांनी कोळसा उचलला नसल्यामुळे टंचाई झाली. कोळसा टंचाईच्या संकटाला राज्य जबाबदार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
केंद्र सरकारमुळे इंधनाचे दर वाढलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय दराशी त्याचा संबंध आहे. याला राज्य सरकारही जबाबदार आहे, आंतरराष्ट्रीय दराशी जोडलेले असल्यामुळे देशात इंधनाचा दर वाढतो. तसेच मोदी सरकार अशा प्रकारे इंधनाची दरवाढ करणार नाही, असं दानवे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App