रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली त्यांच्याच विधानाची आठवण… पंचनामे कसले करता, आधी शेतकऱ्यांना मदत करा!!


प्रतिनिधी

परभणी – मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला असताना राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील सुरू केलेले नाहीत. त्यावरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे… पंचनामे कसले करता… आधी चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला मदत करा, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, हे विधान रावसाहेबांचे स्वतःचे नाही, तर खुद्द मुख्यमंत्री होण्यापूर्वीच्या उध्दव ठाकरे यांचेच आहे. या विधानाची आठवण रावसाहेब दानवेंनी त्यांनाच करून दिली आहे. raosaheb danve patil targets cm uddhav thackeray over floods in marathwada



मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी चिंतेत आहेत. परभणी जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करताना दानवे यांनी शेतक-यांसाठी राज्य सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी असे सांगितले. केंद्र सरकार मदत करेलच पण आता तात्काळ मदत करणे हे राज्य सरकारचे, कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना पूरग्रस्त भागांचे पंचनामे काय करता आधी मदत जाहीर करा, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे आता नशीबाने तेच उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच विधानानुसार पंचनाम्यांपेक्षा शेतक-यांना थेट एकरी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.

raosaheb danve patil targets cm uddhav thackeray over floods in marathwada

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात