National Unity Day 2021: ‘सरदार पटेल केवळ इतिहासातच नाहीत, तर आम्हा देशवासीयांच्या हृदयातही’, पीएम मोदी आणि राष्ट्रपतींचे अभिवादन


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जात आहे. 2014 पासून 31 ऑक्टोबर, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंच पुतळ्याजवळ राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला हजेरी लावली.National Unity Day 2021 Leaders pays tribute to Sardar Vallabhbhai Patel, amit shah at Statue of unity


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त रविवारी देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जात आहे. 2014 पासून 31 ऑक्टोबर, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंच पुतळ्याजवळ राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला हजेरी लावली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त अमित शहा यांनी केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पहार अर्पण केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज ‘राष्ट्रीय एकता दिन’ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रेकॉर्डेड व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “एक भारत, श्रेष्ठ भारतासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण समर्पित करणाऱ्या अशा राष्ट्रीय वीर सरदार वल्लभभाई पटेल यांना आज देश अभिवादन करत आहे. सरदार पटेलजी केवळ इतिहासातच नाहीत तर आपल्यातही आहेत. ते देशवासीयांच्या हृदयातही आहेत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींसह सर्व दिग्गज नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. नैतिकता आणि राष्ट्रसेवेवर आधारित कार्यसंस्कृती प्रस्थापित केल्याबद्दल भारतातील नागरिक त्यांचे सदैव ऋणी राहतील, असे ते म्हणाले.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट केले की, “निश्चय आणि प्रबळ इच्छाशक्तीचे प्रतीक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राष्ट्रीय एकता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.” राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथून ७५ मोटरसायकलस्वारांच्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

 

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ कार्यक्रम

केवडियाजवळील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. पण पंतप्रधान मोदी सध्या रोममध्ये होणाऱ्या G-20 शिखर परिषदेला उपस्थित आहेत, त्यामुळे अमित शाह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंच पुतळ्याजवळ आयोजित राष्ट्रीय एकता दिन सोहळ्याला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अमित शाह उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटद्वारे सांगितले होते.

National Unity Day 2021 Leaders pays tribute to Sardar Vallabhbhai Patel, amit shah at Statue of unity

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात