प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबाद येथे जाहीर सभा आहे. आता यावर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. या सभेत औरंगजेबाचे थडगे नेस्तनाबूत कधी करणार? याची घोषणा सभेत करणार का?, असे खोचक सवाल केला आहे. Will Aurangzeb tomb be destroyed will the Chief Minister show courage?
गजानन काळे यांनी औरंगाबादच्या सभेनिमित्त एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. या सभेसाठी शिवसेनेने होय …संभाजीनगर.. असे म्हणत बॅनरबाजी केली आहे. पण तुम्ही सभेत संभाजीनगर म्हणायचे एवढेच करून नामांतर झाले का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार? मुख्यमंत्री महोदय, असा खोचक सवालही गजानन काळे यांनी केला आहे.
औरंगजेबाचे थडगे नेस्तनाबूत करणार का?
औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरुन मागच्या महिन्यात मोठा वादंग माजला होता. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबरच काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता बुधवारी होणा-या सभेत थडगे नेस्तनाबूत करण्याची घोषणा होणार का? असा प्रश्न करत गजानन काळेंनी शिवसेनेला डिवचले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App