एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत आर्यन खानवर 4 कलमे लावली आहेत.आर्यनचा जामीन लवकरात लवकर मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदे प्रयत्न करत आहेत.उद्या हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी आहे.Will Aryan Khan’s NCB custody end tomorrow, will he be released or will he be in jail again?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ड्रग्स प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 7 ऑक्टोबरपर्यंत( उद्या ) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कोठडीत आहे. आर्यनचा जामीन लवकरात लवकर मिळावा यासाठी त्याचे वकील सतीश मानेशिंदे प्रयत्न करत आहेत.उद्या हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी आहे.
आर्यन ची सुटका होणार की त्याला पुन्हा कोठडीत ठेवले जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.एनसीबीने एनडीपीएस कायद्यांतर्गत आर्यन खानवर 4 कलमे लावली आहेत. त्यापैकी कलम ८ सी आहे.
ज्यात ड्रग्स उत्पादन, ताबा, विक्री, खरेदी, वापर यासाठी तरतुदी आहेत. दुसरा विभाग २०B, जो गांजाच्या वापराशी संबंधित आहे, तिसरा विभाग २७ जो औषधांचा वापर आणि कलम ३५ आहे.
आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. त्याचे खटले देशातील सुप्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे लढत आहेत. सतीश मानेशिंदे यांना अशा बाबींमध्ये तज्ञ मानले जाते. मानेशिंदेंनी संजय दत्तपासून रिया चक्रवर्ती पर्यंत अनेक हायप्रोफाईल केसेस लढवल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App