Aaryan Khan: कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही ! आर्यन खान प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसला इतका पुळका का? कोण होता तो बड्या नेत्याचा मुलगा?


“एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. Aaryan Khan: No drugs found! Why is the NCP so caring about Aryan Khan? Who was the son of that leader?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. यापूर्वीच त्या जहाजावर एका बड्या राजकीय नेत्याचा मुलगा देखील होता अशा बातम्या देखील आल्या. त्या मुलाचे नाव समोर आले नाही मात्र आता नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्याने राष्ट्रवादीकडून ड्रग्ज प्रकरणात आर्यन आणि सर्व बॉलिवूडची पाठराखण का केली जातेय असा सवाल उपस्थित होत आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणात कुठलंही ड्रग्ज सापडलेलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजप हे बॉलिवूड आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

त्या फोटोत कोण?

“एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे, असं दिसतं. त्याच्याबरोबर सेल्फी काढण्यात आला आहे. सेल्फी व्हायरला झाला, तो एनसीबीचा अधिकारी नाही” असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही, मग नक्की कोण आहे, याचे एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.

NCB ने आधिच केलायं खुलासा-

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) स्पष्टपणे सांगते की आर्यन खानसोबतच्या या फोटोतील व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नाही, असं ट्वीट एएनआयने केलं होतं.

“भाजपकडून बॉलिवूड-राज्य सरकारची बदनामी”

भाजप बॉलिवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. 21 तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता. त्यानंतर 22 तारखेला गांधीनगर भागात होता, 21-22 तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणात सापडलं. त्यामुळे 28 तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता, कुठल्या मंत्र्यांना भेटला, याचं उत्तर एनसीबीनं द्यावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Aaryan Khan : No drugs found! Why is the NCP so caring about Aryan Khan? Who was the son of that leader?

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण