‘’ज्यांच्याविरोधात सत्ता लढवली त्यांच्याबरोबरच जाऊन बसलात.’’ असंही म्हणाले आहेत.
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर आजोयित जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. २०१९च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात जे सत्तानाट्य घडलं त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल केला. Why did not you object when Modi Shah were saying that Fadnavis would become CM Raj Thackeray direct question to Uddhav Thackeray
राज ठाकरे म्हणाले, ‘’आठवून बघा ती अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट. शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणूक लढवली. एकत्र निवडणूक लढवल्यानंतर, मला असं वाटतं महाराष्ट्रातील मतदारांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. सगळीकडे मोहीम राबवायची की मतदारांनी मतदानाची जबाबदारी पार पाडली पाहिजे, मतदान केलं पाहिजे आणि उन्हातान्हात उभं राहिल्यानंतर मतदान केल्यानंतर हे यांचा खेळ खेळत बसणार.’’
उद्धव ठाकरेंच्या मागे जाऊन नुसत्या सभा घेऊ नका, महाराष्ट्रासाठी काम करा!!; राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
याचबरोबर ‘’२०१९ ची ती निवडणूक, निवडणूक संपली आकडेवारी आली. आकडेवारी आल्यानंतर एकत्र निवडणूक लढवून युतीमध्ये निवडणूक लढवून शिवसेनेने सांगितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं, की अडीच वर्षांचा मुख्यमंत्री तुम्ही मान्य करा. निवडणुकीपूर्वी बोलला होतात का? चार भिंतींमध्ये म्हणे मला अमित शहांनी सांगितलं. जाहीरपणे का नाही सांगितलं? ज्यावेळी व्यासपीठावर बसून नरेंद्र मोदी सांगत होते की, पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, आक्षेप का नाही घेतला? अमित शाह ज्यावेळी व्यासपीठावर सांगत होते, की पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, तेव्हा आक्षेप का नाही घेतला?’’ असा प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला.
याशिवाय, ‘’ज्यावेळी तुमच्या लक्षात आलं की आपल्याशिवाय यांचं सरकार सत्तेवर बसू शकत नाही. त्यावेळी तुम्ही या गोष्टीची सुरुवात केली, की अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. मग ज्या लोकांनी तुम्हाला युती म्हणून मतदान केलं, त्यांचं काय? त्यानंतर तुम्ही सगळे खेळ खेळणार. त्यानंतर काय केलं तुम्ही? ज्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्याविरोधात तुम्ही निवडणूक लढवली, त्यांच्याबरोबर जाऊन बसलात आणि मुख्यमंत्रीपद घेतलं. त्यांच्याबरोबर कारभार केला.’’ असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App