विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना आत्ता तरी कळले असेल, समाजाला आरक्षण न देण्यामागे कोण आहे? असा प्रश्न भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. राज्यात असंतोष पसरवण्याच काम शरद पवार करतात, असा आरोप देखील त्यांनी केला. राज्य विरोधी बोलणाऱ्या विद्वानांना शरद पवार यांची शिकवण असते. मनोज जरांगे पाटील यांना आत्ता तरी कळले असेल, समाजाला आरक्षण न देण्यामागे कोण आहे? असे देखील लाड म्हणाले. मनोज जरांगे यांना विनंती की, संपूर्ण समाज एकत्र करूया आणि बारामतीला एक मोर्चा काढूया! मुंबईत मातोश्रीवर एक मोर्चा काढूया! कॉंग्रेसच्या टिळक भवनावर एक मोर्चा काढूया! असे आवाहन देखील त्यांनी केले. Who is Ravana behind not giving reservation to Maratha community? Jarange must have known this; BJP MLA Lad’s counterattack
आता खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटील यांना सत्य परिस्थिती समजायला लागली असेल, असे मला वाटत आहे. मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करत होतो. मात्र, त्यांना आम्ही वाद करत असल्याचे वाटत होते. आज त्यांच्या डोळ्यासमोर सत्य परिस्थिती आली आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्य नुसार ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा समाजाचे नेते, प्रा. हाके आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्र बसून चर्चा करा, असे पवारांनी सांगितले आहे. शरद पवार सातत्याने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचेही लाड यांनी म्हटले आहे.
आरक्षण न देण्याचा षड्यंत्राचा मागचा रावण कोण?
तसेच एका समाजाला दुसऱ्या समाजापासून दूर ठेवण्याचे काम कोणी केला असेल तर ते शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण देखील चुकीचे आहे, हे समाजामध्ये पसरवण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. आणि यामधूनच वाद उभे राहतात. काही लोक राज्य विरोधी कारवाई करणाण्यासाठी उभे राहतात. ते लोक जरी बोलत असले तरी ती शिकवणी शरद पवार यांचीच असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. या संपूर्ण आरक्षण न देण्याचा षड्यंत्राचा मागचा रावण कोण? हे आता मनोज जरांगे पाटील यांना समजला असेल, असे देखील प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
बारामतीला मोर्चा काढूया
संपूर्ण समाज एकत्र करूया आणि बारामतीला मोर्चा काढूया. संपूर्ण समाज एकत्र करूया आणि मातोश्रीवर मोर्चा काढूया. संपूर्ण समाज एकत्र करूया आणि टिळक भवन काँग्रेसच्या मुख्यालयावर एक मोर्चा काढूया, असे आवाहन देखील प्रसाद लाड यांनी केले आहे. या माध्यमातून या सर्वांचे भूमिका स्पष्ट व्हायला हवी, असे देखील प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांची दुटप्पी भूमिका समोर आली
ज्यांनी राज्याची सत्ता उपभोगली, ज्यांनी मुख्यमंत्री पद उपभोगले आहे. त्यांना सत्तेत पुन्हा यायचे आहे. आणि सत्तेत पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा लोकांची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. आमच्या सरकारने दिलेले मराठा आरक्षण किती योग्य होते, हे देखील समाजाला स्पष्ट होईल. समाजाला सत्य समजेल, असे देखील प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. मराठा असो, ओबीसी असो, सर्व समाज घटकातील सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचा दावा देखील लाड यांनी केला आहे. या माध्यमातून शरद पवार यांची दुटप्पी भूमिका समोर आली असल्याचा आरोप देखील त्यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमच्यासोबत यावे आणि शरद पवार यांना मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारावे, असे आव्हान देखील प्रसाद लाड यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App