विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : “50 खोके एकदम ओके”, अशी घोषणाबाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कायम शरसंधान साधणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या महाअधिवेशनात खणखणीत प्रत्युत्तर दिले. आम्ही बाळासाहेबांचा फक्त वैचारिक वारसा घेतला. शिवसेनेच्या खात्यातले आमचे हक्काचे 50 कोटी रुपये उद्धव ठाकरेंना त्यांनी मागताच देऊन टाकले, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी महाअधिवेशनात केला यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार तोफ डागली.We took Balasaheb’s ideological legacy but gave 50 crores of Shiv Sena accounts to Uddhav Thackeray; Chief Minister’s secret explosion!!
एकनाथ शिंदे म्हणाले :
आमच्यावर फक्त आरोपच आरोप करत आले आहेत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे का पन्नास खोके 50 खोके सर्व नेते मंडळी समोर आहेत. शिवसेना सोडून इतर पक्षातील नेते आपल्याकडे येत आहेत. आपल्याला जेव्हा शिवसेना मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यांना धडकी भरली. मी म्हटले तुमची आम्हाला संपत्ती नको. बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे.
आम्हाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यावर शिवसेनेच्या खात्यातून 50 कोटी आम्हालाच मिळाला पाहिजे असे पत्र तुम्ही आम्हाला पाठवले. आमच्या लक्षात आले की तुम्हाला बाळासाहेबांची विचार नकोत. म्हणून मी उद्धव ठाकरे यांना 50 कोटी देऊन टाकले. 50 कोटी मागताना तुम्हाला जनाची नाही तरी मनाची पाहिजे होती. पण तुम्हाला तसे काही न वाटता रोज तुम्ही आमच्यावरच आरोप करत सुटलाय!!
उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्यांच्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपले आहेत. तुमच्यावर आलेली संकट मी छातीवर घेतली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहे, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी बोलेन. बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते, तेथे आता रडण्याचा आवाज येतो.
ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केलं पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं. ही शिवसेना कार्यकर्ते आहेत अशी कार्यकर्ते किती आहेत, जेलमध्ये गेलेलो शिवसेना अशीच मोठी झाली नाही रक्ताचे पाणी केलं लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवले. आयत्या पिठावर रेघोट्याही नीट मारता आल्या तुम्हाला, मनोहर जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं काम तुम्ही केलं. त्यांचे घर जायचे आदेश तुम्ही दिले होते.
रामदास कदमांचा पण तुम्हाला “मनोहरपंत” करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे असतील त्यांनी काय मागितले होते?? तुम्हाला यांचा त्रास होता??, पण या प्रत्येकाला तुम्ही त्रास दिला म्हणून त्यांनी शिवसेना सोडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App