maratha reservation : कोल्हापुरात झालेल्या मराठा आरक्षण मूक आंदोलनाबाबत आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या आंदोलनात खा. संभाजीराजे छत्रपती यांच्यासह वंचितचे नेत अॅड. प्रकाश आंबेडकर यांचाही सहभाग होता. भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या आंदोलनावर भाष्य केलं आहे. दरेकर म्हणाले की, छत्रपती सांभाजीराजे यांचा सर्व पक्षांनी, नेत्यांनी सन्मान केला. सर्व नेत्यांनी आपापल्या भूमिका आज आंदोलन स्थळी मांडल्या. आंदोलनात भूमिका मांडून मार्ग निघाला का ? प्रत्यक्षात मार्ग काढण्यासाठी ते व्यासपीठ नव्हते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आंदोलन स्थळी आले असते तर मराठा संदर्भात संदर्भात निर्णय घेऊ शकले असते. परंतु आंदोलनाची सुरवात म्हणून या विषयी संवाद झाला, यातून काय निष्पन्न होत आहे, मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देणार आहे, मग चर्चेसाठी वेळ देण्यासाठी हे केवळ आंदोलन होतं का? या सर्व गोष्टी सर्व लोकांना माहिती आहेत. दोनच ठिकाणची चर्चा होऊ शकते, निर्णय होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून जे निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी घेतले होते, तरतुदी केल्या होत्या. तशाचप्रकारे आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत शासनाने निर्णय घ्यावा. यामध्ये कुठे टेकनॉलॉजि किंवा विज्ञान नाही आहे. प्रक्रिया पूर्ण न करता केंद्राने करावे अशाप्रकारचं बोलणं असेल तर त्या बोलण्याला काडीमात्र अर्थ नाही. इतकं सोप्प असतं तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस किंवा आम्ही केंद्रात जाऊन एका मिनिटात मराठा आरक्षण आणले असते. प्रक्रिया पूर्ण करून, मागासवर्गीय अयोग गठित करून राज्य शासनाकडून राज्यपालांकडून केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जाणं ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, असेही ते म्हणाले. दरेकर म्हणाले की, सर्व लोकं मराठा समाजाच्या मागे उभी राहत आहे. सर्व पक्षाचे आमदार, लोकप्रतिनिधी, मंत्री मराठा समाजासाठी उभे राहत आहे. ही जमेची बाजू आहे. जिल्ह्या जिल्ह्यात जमवून आंदोलनाचा कार्यक्रम होईल. यातून काही आउटपूट निष्पन्न होणार नाही. हे मुख्यमंत्री स्तरावर, सरकार स्तरावर होईल. सरकारने प्रक्रिया पूर्ण केल्यावर केंद्राची भूमिका राहील. त्यावेळेस केंद्राने काही केलंन नाही तर आपण बोलू शकतो परंतु जी गोष्ट केंद्राकडे गेलीच नाही, जो बॉल केंद्राच्या कोर्टात नाही तरीही त्याला केंद्राकडे बोट दाखवत बोलायचं असेल तर अशा गोष्टींमधून राजकारणाचा वास येत आहे का? अशा प्रकारचा संशय निर्माण होऊ शकतो. watch Pravin darekar on maratha reservation agitaion in kolhapur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App