Maratha Reservation : कोल्हापुरातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खा. संभाजीराजे छत्रपती यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं. यावर खा. संभाजीराजेंनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पाच मागण्या दिल्या आहेत. मूक आंदोलन झाल्यानंतर चर्चेला बोलावलं, याचं मी स्वागत करतो. चर्चा सकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे. मात्र झाली नाही तर काय होईल ते मला सांगायची गरज नाही. खा. संभाजीराजे पुढे म्हणाले की, आजची भेट उद्या व्हावी अशी समन्वयकांची भूमिका होती. पण मुख्यमंत्र्यांचा आज बैठक घेण्यासाठी आग्रह होता. भेटीआधी समन्वयकांची कोणतीही बैठक होणार नाही. आरक्षणासाठी लढा कायम राहणारच आहे. तो लढा चालू असताना राज्य सरकारने आपल्या हातातल्या गोष्टी मार्गी लावाव्यात. केंद्र स्तरावर माझे प्रयत्न या आधीपासून सुरू आहे. अनेकांनी पत्रही दिलं आहे. समाजाच हित होणार असेल तर घटनेत दुरुस्ती होऊ शकते, असेही ते म्हणाले. Watch MP Sambhajiraje Comment On CM Thackeray Invitation To talk On Maratha Reservation
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App