विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: मागच्या दीड वर्षापासून covid-19 म्हणजेच कोरोना या आजाराने जगभरात थैमान घातलं आहे .याची अनेक हृदयद्रावक दृष्य आपण पाहिली 2020 मध्ये नव्हती इतकी वाईट अवस्था 2021 मध्ये आपण पाहतोय..WATCH: Maharashtra’s corona’s horror reality: even after death
महाराष्ट्रात तर या कोरोनाने सर्वच हद्दी पार केल्यात.महाराष्ट्राची दुर्दशा म्हणता येईल.रोज covid-19 रुग्णांचे आकडे पाहिले तर काळजात धस्स होतंय . कुठे बेड नाही तर कुठे ऑक्सिजन नाही कुठे अंत्यसंस्कारासाठी रांगा तर कुठे इंजेक्शनचा तुटवडा हाल आणि बेहाल. त्यातच आणखी भर मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते असेही करोना रुग्ण आता म्हणू शकणार नाही कारण मृत्युनंतरचे भयावह वास्तव महाराष्ट्र सध्या पाहतोय आणि अनुभवतोय….
पहा हा खास रिपोर्ट
मृत्युनंतरही मृतदेहांची अवहेलना होत असल्याच्या घटना महाराष्ट्र पाहतोय.
कोरोनाने मृत्यु झालेल्या रुग्णांचा मृतदेह जाळण्यासाठी सरणावर लाकडे कमी पडत आहेत. त्यामुळे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहांचे लचके कुत्रे तोडून नेत आहेत. भंडारा जिल्ह्यातील ही काळीज पिळवटून टाकणारी घटना.
तर दुसरीकडे मोकाट कुत्रे जमीन उकरुन मृतदेहांचे लचके तोडत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. होय हे घडले आहे बुलढाणा जिल्हयात मलकापूर स्मशानभुमीत .
कोरोनाला रोखण्यासाठी स्वतःच लढावं लागणार आहे. मास्क वापरा ,गर्दी टाळा ,सारखे हात धुवा सॅनिटायझर वापरा त्या बरोबरच लसीकरण देखील करून घ्या स्वतः सह इतरांनाही जपा. वारंवार हात जोडून विनंती करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शब्द पाळा .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App