Chhagan Bhujbal on OBC Reservation : आरक्षण वाचविण्यासाठी मराठा समाज आक्र मक झाला असतानाच, राजकीय आरक्षण टिकावे म्हणून इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) वतीने आक्रोश आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रद्द झाले. राजकीय आरक्षण कायम राहावे म्हणून आघाडी सरकारने पाठपुरावा सुरू केला. मागासावर्ग आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करून प्रक्रिया सुरू केली असली तरी इतर मागासवर्ग समाजात आरक्षण रद्द झाल्याने असंतोष असल्याचे समता परिषदेचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मराठा समाजाचे आरक्षण टिकावे म्हणून सरकारच्या पातळीवर जी धावपळ दिसते तशी इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत दिसत नाही, अशी खंतही भुजबळ यांनी व्यक्त केली. यातूनच समाजाचा आक्रोश समोर आणण्याच्या उद्देशानेच आंदोलन करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. Watch Chhagan Bhujbal on OBC Reservation agitation an Rally in Nashik
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App