वारज्यात चार वाहने एकमेकांना धडकली; चार जण गंभीर जखमी

पुण्यातील वारजे परिसरात भरधाव ट्रक मोटारीला धडकल्याची घटना घडली आहे.या अपघातात मोटार पुढील टँकरला धडकली आणि गाडीचा चक्काचुर झाला आहे. या अपघातामुळे सदर मार्गावर वाहतूककोंडी झाली.Warje area track dashesh car, in this accident four people injured


विशेष प्रतिनिधी 

पुणे – अपघाताचे ब्लॅकस्पॉट असणारा वारजे येथील पुलावर गुरुवारी सकाळी दहा वाजता चार वाहने एकमेकांना धडकली. या अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले असून एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Warje area track dashesh car, in this accident four people injured

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजे पुलावरुन एक मोटार जात असतांना पाठीमागून येणा-या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की मोटार थेट पुढे असणा-या टँकरवर जाऊन धडकली. याच वेळी बाजुला असणा-या एकावाहनाचे नुकसान या विचित्र अपघातात झाले. या घटनेत मोटारीचा चक्काचूर झाला आहे. या मोटारीत एकाच कुटुंबातील चार जण होते. या अपघातात ते जखमी झलो आहे. यात नवरा बायको आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. त्यांना तातडीने येथील जवळच्या रुग्णालया उपचारासाठी दाखल करण्यात आहे. जखमींची नावे समजु शकली नाही

अपघातानंतर या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास ४ ते ५ किमी अंतरापर्यंत या रांगा होत्या. अनेक बेशिस्त वाहन चालकांनी आपली वाहने सेवा रस्त्यावर दामटल्याने वाहतूककोंडीत आणखी भर पडली. दरम्यान वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. तसेच त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

Warje area track dashesh car, in this accident four people injured

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात