WadgaonSheri वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का, रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटात प्रवेश

विशेष प्रतिनिधी

वडगाव शेरी  : वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना विजयी करण्यामध्ये आमचे मोलाचे योगदान राहिल असा शब्द त्यांनी. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिला आहे. Rekha tingre

शरदराव पवार यांचे उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रवेश केला. वडगाव शेरी येथील माजी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीपआबा तुपे, सन्मित्र सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अनिल तुपे, धनकवडी परिसरातील समीर धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. तेथील उमेदवारांना विजयी करण्यामध्ये आमचं मोलाचं योगदान राहिल, असा शरद पवार यांना शब्द दिला.


sharad pawar and ajit pawar काका – पुतण्यांची निवडणुकीच्या ऐन मध्यात जुंपली; अदानींना घेतले मधी!!


रेखा टिंगरे या वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक एकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र शरद पवार आणि वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचे सांगितले.

रेखा टिंगरे या 2007 मध्ये प्रभाग क्रमांक 1 मधून काँग्रेसच्या तिकिटावर महापालिकेत निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2012 आणि 2017 मध्ये त्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या भावकीतील आहेत.

WadgaonSheri rekha tingre sharad pawar group entry

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात