विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. श्री.बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली! अशा शब्दांमध्ये राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे ट्विट करून बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. Vratastha ascetics in the form of Babasaheb left us; Tribute to MP Sambhaji Raje
आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. श्री.बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली! — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 15, 2021
आयुष्यभर एक व्रत घेऊन जगलेले इतिहास तपस्वी आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली.
श्री.बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 15, 2021
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. मनसे प्रमुख राज ठाकरे, साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आदींनी बाबासाहेबांच्या पर्वती येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. बाबासाहेबांचे इतिहासातले योगदान महाराष्ट्र विसरू शकत नाही, अशा शब्दांमध्ये अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याची आग्रही मागणी केंद्र आणि राज्य सरकार या दोघांकडे केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App