प्रतिनिधी
मुंबई : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणूक तारखेत बदल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारी ऐवजी 26 फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. बारावीच्या परीक्षांमुळे मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. Kasba, Chinchwad by-election date change; Voting on 26th February instead of 27th
मात्र या पोटनिवडणुकीच्या निकालाच्या तारखेत बदल करण्यात आलेला आहे. निकाल 2 मार्चलाच लागणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने पत्रक प्रसिद्ध करत दिली आहे.
कसबाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते. मात्र, या तारखेत आता बदल करण्यात आला आहे. आता 26 तारखेला मतदान होणार आहे. बारावीची परीक्षा आणि मतदार एकाच दिवशी आल्याने या तारखेत बदल करण्यात आल्याचे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.
2 मार्चला निकाल होणार जाहीर
या निवडणुकीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून, 7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. 8 फेब्रुवारीला अर्जांची छाननी तर 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी मतदान 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App