विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली. महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या. परंतु महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांच्या टक्केवारीत मात्र फक्त 0.17 % एवढाच फरक होता. मतदानाच्या आकड्यांचे विश्लेषण केल्यावर एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानामुळे महाराष्ट्रात तब्बल 14 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा फटका बसला. याचा उच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणेरी मठातील कार्यक्रमात केला. त्यांनी मालेगाव, अमरावती, उत्तर मध्य मुंबईची उदाहरणे दिली. फडणवीसांनी व्होट जिहादचा आरोप केला. तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी जिहादचा अर्थ समजावून घ्या, अशी मखलाशी करत फडणवीसांचा प्रतिवाद केला.
पण लोकसभा निवडणुकीतल्या मतदानाची आकडेवारी तपासली आणि तिचे विश्लेषण केल्यावर व्होट जिहादचीच वस्तुस्थिती समोर आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईत मिळालेल्या विजयात व्होट जिहादचा मोठा वाटा असल्याचे आकडेवारीतूनच उघड झाले तसा आरोप किरीट सोमय्या यांनी अधिक केलाच होता, तो आकडेवारीने सिद्ध झाला.
नया नगर मीरा रोड येथील हैदरी चौक, बैतूल अब्बास, फातिमा मंजिल, मीरा तबस्सुम, नसरीन अपार्टमेंट, अश्या 24 बूथ क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना – भाजप युतीच्या उमेदवाराला 354 मतं मिळाली, तर उद्धव ठाकरे सेनेच्या उमेदवाराला 12,052 मते मिळाली. या नयानगर येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा प्रतिष्ठेचा वेळेला दंगल घडविण्यात आली होती. व्होट जिहादची जीत म्हणजे उध्दव ठाकरे सेनेची जीत ठरली.
दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीतील मतदानाची गोळाबेरीज तशीच होती. या मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी बाजी मारली. या भागात यामिनी जाधव यांना 191 मते तर सावंत यांना 311 मते मिळाली होती. अरविंद सावंतांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून देऊन मुस्लिमांच्या रस्त्यावरच्या नमाज पठणाचे समर्थन केले होते. मशिदींचा एफएसआय वाढवून देण्याची मागणी केली होती. त्या बदल्यात मुस्लिमांनी ठिक ठिकाणी मेळावे घेऊन मशालीवर ठप्पा मारायचे आवाहन केले होते मुंबईतील मुंबादेवी येथेही उद्धव ठाकरे सेनेच्या बाजूने मतदान झाले. तर भेंडीबाजार, मोहम्मद अली रोड, चोर बाजार येथील 38 बूथवर यामिनी जाधव यांना खातंही उघडता आले नाही. त्यांना एक अंकी मतं मिळाली नव्हती.
धुळे लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना चांगले लीड मिळाले होते. परंतु ते 1 लाख 89 हजार एवढी मते घेऊन काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी फक्त मालेगाव विधानसभा मतदारसंघात तोडले आणि त्यांचा 4300 मतांनी विजय झाला.
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणांना जमील हायस्कूल खोली 1 मध्ये 1 मत, कॉंग्रेस बळवंत वानखेडेंना 783 मते, जमील हायस्कूल खोली 3 मध्ये नवनीत राणांना 0 मते आणि कॉग्रेसच्या बळवंत वानखेडेला 871 मते मिळाली. या परिसरातील एकूण 36 बूथ मध्ये भाजपाला फक्त 126 मते मिळाली, तर कॉंग्रेसला एकगठ्ठा 25,748 मते मिळाली.
काँग्रेसने केली तक्रार
दक्षिण मुंबई मतदारसंघातील व्होट जिहादसंदर्भातील वक्तव्यावरुन वाद झाला होता. हा मतदारांचा अपमान असल्याचा आरोप करण्यात येत होता. मुंबईतील या वक्तव्याचे पडसाद दोन आठवड्यांपूर्वी अमरावतीत दिसून आले होते. स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सोमय्या यांच्याविरोधात अमरावतीमधील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पण शिवसेना आणि काँग्रेस यांच्या दाव्यांच्या विपरीत प्रत्यक्षात आकडेवारी मात्र व्होट जिहाद झाल्याचीच दिसली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more