प्रतिनिधी
पुणे : प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी आज शिवसेना – भाजप संबंध, कंगना राणावत यांच्याविषयी परखड मते व्यक्त करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्याच वेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले आपले नाते देखील उलगडून सांगितले आहे.Vikram Gokhale reveals relationship with Balasaheb
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर विक्रम गोखले बोलत होते. ते म्हणाले, की माझी सख्खी आत्येसासू ही शिवसेनेच्या महिला आघाडीची पहिली प्रमुख. बाळासाहेब ठाकरे हे माझे मामे सासरे. असे आमचे नाते आहे. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा मुंबईतल्या मराठी माणसाला प्रचंड आधार वाटला. बाळासाहेबांची भाषणे ऐकून महाराष्ट्र तृप्त झाला आहे. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर आजचे सगळे राजकारण सगळे फिरले आहे. कुणाचेच कोणाला काही वाटेनासे झाले आहे.
शिवसैनिकांची घुसमट – अस्वस्थताच विक्रम गोखले यांच्या मुखातून बाहेर आली आहे का…??
या सगळ्यात मराठी माणूस भरडला जातोय. प्रसार माध्यमांना देखील याची कल्पना नाही. देश ज्या संकटाच्या कड्यावर उभा आहे त्या संकटाच्या वेळी शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र यावे यावे असे मला वाटते. बाळासाहेबांच्या आत्म्याला देशाची ही अवस्था पाहून किती यातना होत असतील हे माझ्यासारख्या अनेक बाहेर राहिलेल्या माणसांना सतत जाणवत असते म्हणून मी परखडपणे बोलून मोकळा होतोय, अशा भावना विक्रम गोखले यांनी बोलून दाखविल्या.
पक्षाच्या कार्यकर्त्यांना यात मी बोल लावत नाही पण जे चालले आहे ते गणित चुकले आहे. पण अजून वेळ गेलेली नाही. हे गणित बरोबर जुळवून आणता येऊ शकते. शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र आले पाहिजे. यातूनच काही मार्ग निघू शकेल. देशाला त्यातून भवितव्य चांगले करता येऊ शकेल, असे वक्तव्यही विक्रम गोखले यांनी केले आहे.
विक्रम गोखले यांनी आजच्या आपल्या परखड वक्तव्यातून थेट बाळासाहेबांशीच असलेले आपले नाते उलगडून दाखवल्याने शिवसैनिकांमध्ये सध्या कोणत्या प्रकारची अस्वस्थता आहे, हेच स्पष्ट होताना दिसते आहे. शिवसेना आणि भाजप मधल्या नेतृत्वांनी आपापल्या अहंकारातून ही तेढ निर्माण केल्याचे दुःख देखील विक्रम गोखले यांच्या वक्तव्यातून बाहेर आलेले दिसते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App