प्रतिनिधी
नाशिक : आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल मिरवणूकीच्या निमित्ताने इतर धर्मियांकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ग्रामस्थ आणि विश्वस्तांच्या इच्छेनुसार आमदार नितेश राणे यांनी त्रंबकेश्वर मंदिरात येऊन आज दर्शन घेतले आणि हजारो हिंदू बांधवांच्या उपस्थितीत महाआरती केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.Unreasonable defamation of Hindus in Trimbakeshwar sandal procession case; Mahaarti in the presence of MLA Nitesh Rane
यावेळी नितेश राणे म्हणाले की, या भागातील शांतता भंग करणे हा आमचा हेतू नाही. पण सातत्याने १३ मे रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात जे गैरसमज पसरवले जात आहे, हिंदूंची बदनामी केली जातेय, त्या सगळ्याबाबतीत गावकऱ्यांच्या इच्छेनुसार, ट्रस्टनुसार आज आम्ही भेट देण्यासाठी येथे आलो. उरूस निघाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे धूप दाखवण्याची परंपरा आहे, असे सातत्याने बोलले जाते. परंतु, हे साफ खोटे आहे. आम्ही यासंदर्भात ग्रामस्थांशी बोललो, विश्वस्तांशी बोललो. अशा कोणत्याही पद्धतीची परंपरा नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे नितेश राणेंनी म्हटले आहे.
तसेच राणे पुढे म्हणाले की, उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. ते लोक काय करतात? की धूप दाखवतात हा त्यांचा प्रश्न आहे. जिहादी विचारांचे युवक या मंदिरात आले. त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. मंदिर बंद असताना मंदिरामध्ये शिरण्याचा हट्ट करण्यात आला. तुम्हाला पूजा-अर्चा करायची आहे तर सगळे जसे येतात तसे आतमध्ये या. आरतीचे सामान घ्या, पूजेचे सामान घ्या. रांगेत उभे राहा, आतमध्ये या. सगळे जसे दर्शन घेतात, हिंदू धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा. याला कोणालाही आक्षेप नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी अदिवासी विकास मंत्री अशोक उईके, हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते, त्र्यंबकेश्वरचे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने आमदार नितेश राणे यांचा यावेळी सत्कार केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App