प्रतिनिधी
मुंबई : निवडणूक आयोग बरखास्तीची सूचना आणि माझ्या मनात 10 चिन्हे आहेत…, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत आज एवढेच नवे मुद्दे होते. बाकी सर्व मुद्दे परवाचेच त्यांनी मांडले. त्याचबरोबर निवडणूक आयोगाला सर्वच पक्षांनी वेळीच रोखले नाही, तर 2024 ची लोकसभा निवडणुकी शेवटची निवडणूक ठरू शकते, असा कुमार केतकरी निष्कर्षही उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत काढला. Uddhav Thackeray suggest dissolution of election commission
माझा पक्ष चोरला. चिन्हा चोरले. सगळे माझ्यापासून हिरावून घेतले. अमित शाह महाराष्ट्राचे नंबर एकशे शत्रू आहेत. शिवसेनेची सुपारी देऊन हत्या केली आहे. वगैरे सर्व जुने मुद्दे उद्धव ठाकरेंनी आजच्या पत्रकार परिषदेत रिपीट केले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर शिवसेना भवन शिंदे गट दावा सांगतो की काय??, अशी भीती निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले होते. पण शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिरासारखे आहे. त्यावर आम्ही कधीच दावा सांगणार नाही. शिवसेनेच्या शाखांवरही दावा सांगण्याचा प्रश्न नाही, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने दिलासा दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी केल्या. पण दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जाऊन तिथे असलेल्या शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. आपण आदित्य ठाकरे आणि काही शिवसेनेचे नेते महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे ते पुन्हा म्हणाले. हाच मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेतही सांगितला.
पण त्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत दोन-तीनच नवीन मुद्दे होते. ते म्हणजे देशात लोकशाही पाहिजे. पक्षात लोकशाही पाहिजे. पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे. मग निवडणूक आयोगाची नेमणूक का??, असा सवाल करत त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची सूचना केली. प्रशांत भूषण या संदर्भात न्यायालयात दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली. त्याचवेळी निवडणूक आयोगाला आपण म्हणजे सर्वच विरोधी पक्षांनी वेळीच रोखले नाही, तर 2024 मध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुका होतील, असे भाकीत उद्धव ठाकरे यांनी वर्तवले. नेमके असेच भाकीत 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पत्रकार आणि राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी वर्तविले होते. पण त्यानंतर बऱ्याच निवडणुका झाल्या आता उद्धव ठाकरे यांनी 2024 ची निवडणूक ही शेवटची ठरेल असे भाकित वर्तवले आहे त्यानंतर कोणत्या निवडणुका होतात का??, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे गटाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याची आज सुनावणी झाली नाही, तर ती उद्या होणार आहे. मात्र निवडणूक चिन्हाबाबत अजूनही ठाकरे गटात धाकधूक आहे, हेच उद्धव ठाकरेंच्या आजच्या पत्रकार परिषदेतील एका वक्तव्यानंतर समोर आले. आपल्या मनात एकच नाही तर 10 चिन्हे आहेत. सुप्रीम कोर्टात काय होईल हे सांगता येत नाही कारण आपण वर्तमानपत्र चालवतो भविष्यपत्र चालवत नाही, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यामुळे ठाकरे गट धनुष्यबाणाची लढाई सुप्रीम कोर्टात तरी किती हिरीरीने लढणार??, याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App