प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातला संघर्ष एडव्हांटेज शिंदे अशा निर्णायक टप्प्यावर आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय स्वतःच्या ताब्यात घेतले, तेही विना खळखळ!! एरवी शिवसेनेतील सर्व संघर्ष हे तोडफोड किंवा मारामारी असे झाल्याचा अनुभव आहे. मात्र, आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळ पक्षाच्या कार्यालयाचा ताबा घेताना ठाकरे गटाने कोणतीही खळखळ केली नाही. Legislature Shiv Sena Party Office to Chief Minister Eknath Shinde; That too without fuss
द फोकस एक्सप्लेनर : निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणता पर्याय? वाचा सविस्तर
शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका तात्काळ ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला यावर शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, कोर्ट नियमाप्रमाणे चालत, मर्जी प्रमाणे नाही. कधीही गेल, सुनावणी होईल असे होत नाही.
राज्यभरातील शाखांवर दावा करणार का?, यावर भरत गोगावले म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या!! ठराविक लोकांनी चुकीचे सांगितल्यानेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे, असा टोलाही भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App