Uddhav Thackeray : मुसलमानांच्या एकाच वेळेच्या मतांची किंमत समजली का उद्धव बाबू??

uddhav thackeray

मुसलमानांच्या एकाच वेळेच्या मतांची किंमत समजली का उद्धव बाबू??, असा सवाल करायची वेळ मातोश्री वर काल सायंकाळी चालून आलेल्या मुसलमान आंदोलकांनी उद्धव ठाकरेंवर आणली. त्याचे उत्तर न देताच उद्धव ठाकरे ठाण्याच्या सभेला निघून गेले. ठाण्यात गडकरी रंगायतनमधल्या भगव्या सप्ताहात समारोपात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे, अमित शाह वगैरे नेत्यांवर फुल्ल बॅटिंग केली. पण मुसलमान मातोश्रीवर चालून आल्याबद्दल “ब्र” देखील काढला नाही, पण म्हणून त्या सवालाची किंमत कमी होत नाही. Muslims demanded their vote price to uddhav thackeray

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुसलमानांनी फक्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा मतदान काय केले, तर त्यांनी लगेच त्या मतांची राजकीय किंमत उद्धव ठाकरेंकडे मागितली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 खासदारांनी लोकसभेत मोदी सरकारने मांडलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध दाखवला नाही. विरोध न दाखवताच ते तिथून बाहेर पडले, याबद्दल उद्धव ठाकरेंना फक्त एकदाच एकगठ्ठा मतदान करणाऱ्या मुसलमान समाजाला राग आला आणि त्यांनी थेट मातोश्री गाठली. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या मतांमुळे तुमचे खासदार निवडून आले आणि वक्फ बोर्डाच्या विरोधात मांडलेल्या विधेयकाला त्यांनी विरोध केला नाही. हे चांगले झाले नाही, असे मुसलमानांनी उद्धव ठाकरेंना सुनावले. ते त्यांना ऐकून घ्यावे लागले. यामुळेच वर उल्लेख केलेला सवाल केला, मुसलमानांच्या एकाच वेळच्या मतांची किंमत समजली काय उद्धव बाबू??

संघाच्या पठाडी बाहेरचे बाळासाहेबांचे हिंदुत्व

बाळासाहेबांनी आणि त्यांच्या शिवसैनिकांनी रक्त आणि घाम गाळून शिवसेना उभी केली. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या राजकारणाला त्याआधी अजिबात किंमत नव्हती, ती किंमत बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी मिळवून दिली. त्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या जोरावर बाळासाहेबांनी शिवसेना – भाजप युतीची सत्ता महाराष्ट्रात आणून दाखवली. शिवसेना नावाचा दबदबा देशपातळीवर तयार केला. बाळासाहेब सुरवातीला जरी प्रादेशिक पातळीवरचे नेते होते, तरी त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे ते देशपातळीवरचे नेते झाले. भाजपच्या नेत्यांना देखील त्यांच्या संघाच्या पठडी बाहेरची बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका आणि प्रतिमा मान्य करावी लागली. उद्धव ठाकरेंनी देखील बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका अगदी 2019 पर्यंत कायम ठेवून शिवसेनेची प्रखरता टिकवून धरली होती.



पण केवळ भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाशी फाटले, त्यांच्याशी पंगा घ्यावा लागला म्हणून उद्धव ठाकरे यांनी सरळ हिंदुत्वच सोडून दिले आणि ते काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नादी लागून मुसलमानांच्या कच्छपी लागले. मुसलमानांनी त्यांना फक्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मते दिली, तर त्याची किंमत मुसलमानांनी अवघ्या 6 महिन्यांच्या आत मागितली. मग हिंदूंनी शिवसेनेला केलेल्या कायम मतांची किंमत किती असावी??, ती उद्धव ठाकरेंनी मोजली का?? उलट केवळ भाजपच्या नेतृत्वाशी फाटले म्हणून हिंदू मतदारांशी गद्दारी करून उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले. इथे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यातील फाटणे किंवा उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेतृत्वाशी पंगा घेणे याला कोणीच गैर मानायचे कारण नाही, पण केवळ भाजपच्या नेतृत्वाची फाटले म्हणून थेट हिंदुत्वाला फाट्यावर मारून मुसलमानांना कवटाळणे यावर आक्षेप आहे.

धोक्याची घंटा

मुसलमानांनी फक्त एकदाच मतदान करून उद्धव ठाकरेंना जर त्या मतांची किंमत मागितली असेल, तर ती त्यांच्यासाठी खाडकन डोळे उघडणारी बाब आहे. मातोश्री बाहेरच्या मुसलमानांच्या आंदोलनातून तरी उद्धव ठाकरेंचे डोळे उघडतील का??, हा कळीचा सवाल आहे. कारण मुसलमानात फक्त मातोश्रीच्या दारात येऊन घोषणाबाजी करत होते. त्यापलीकडे अजून तरी जाऊन त्यांनी त्यांच्या मतांची किंमत मागितलेली नाही. पण जर तशी त्यांनी किंमत मागितली तर उद्धव ठाकरे यांना ती किंमत देणे परवडणार आहे का??, हाही त्या पुढचा कळीचा सवाल आहे. एकदाच मतदान केल्याची किंमत मुसलमानांनी मागून उद्धव ठाकरेंच्या कानाशी धोक्याची घंटा वाजवली आहे. त्यातून योग्य संदेश घ्यायचा का नाही??, हे उद्धव ठाकरेंनी ठरवायचे आहे.

Muslims demanded their vote price to uddhav thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात