मुख्यमंत्रीपद राजीनामा : वाजपेयी, देवेगौडांच्या मांदियाळीत जाऊन बसले उद्धव ठाकरे!!


मुख्यमंत्री पद सोडताना उद्धव ठाकरे यांनी जे फेसबुक लाईव्ह मधून इमोशनल भाषण केले त्यामुळे ते अटल बिहारी वाजपेयी आणि एच. डी. देवेगौडा या दोन माजी पंतप्रधानांच्या मांदियाळीत जाऊन बसले आहेत. Uddhav Thackeray made emotional speech like atal bihari vajpeyee and h.d.devegauda

अटल बिहारी वाजपेयी यांनी 1996 मध्ये अल्पमतातील 13 दिवसांचे सरकार बनवले होते खरे, परंतु त्यांना तेव्हा बहुमत जुळवता आले नव्हते. त्यामुळे ते लोकसभा सभागृहात जरूर बहुमताला सामोरे गेले होते, परंतु प्रत्यक्ष मतदानापूर्वीच आपण बहुमत जुळवू शकत नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी इमोशनल भाषण करून त्यावेळी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.

अटल बिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यावेळच्या तिसऱ्या आघाडीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्या वेळचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांना पंतप्रधान बनवण्यात आले होते. मात्र अवघ्या 9 महिन्यांमध्ये सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसने देवेगौडा यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी त्यांना ोकसभेत सहभाग विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. ते देखील लोकसभा सभागृहात विश्‍वासदर्शक ठरावाला जरूर सामोरे गेले खरे.


Raj – Uddhav : कोण असली – कोण नकली??; गर्दीच्या भांडणात घरातल्या हिंदुत्वातच जुंपली!!


परंतु, मतदानापूर्वी जोरदार इमोशनल भाषण करून त्यांनी पंतप्रधान पद सोडून दिले होते. त्यावेळी देवेगौडा यांचे एक वक्तव्य प्रचंड गाजले होते, “ओल्ड मॅन इन अ हरी” म्हणजे वृद्ध गृहस्थ फार घाईत आहे, हा सीताराम केसरी यांना देवेगौडा यांनी लगावला टोला संपूर्ण देशाच्या अजूनही लक्षात राहिला आहे!!

आजच्या राजीनाम्याच्या इमोशनल भाषणात उद्धव ठाकरे यांनी असाच टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मी पुन्हा येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण मी कधीच पुन्हा येईन, असे म्हटले नव्हतो. माझी मूळात विधिमंडळात जाण्याची पण इच्छा नव्हती. तुम्ही ठाकरे कुटुंबियांना ओळखता. माझ्या इच्छेविरुद्ध मला विधिमंडळ सदस्य व्हावे लागले आणि मुख्यमंत्री व्हावे लागले. आज मी दोन्ही सोडत आहे, असे इमोशनल भाषण करून उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाच्या राजकारणातून एक्झिट घेतली.

Uddhav Thackeray made emotional speech like atal bihari vajpeyee and h.d.devegauda

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात