उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना मोठे इमोशनल भाषण केले. शरद पवार आणि सोनिया गांधी यांना त्यांनी धन्यवाद दिले. पण आपल्या शिवसैनिकांच्या आणि शिवसैनिक आमदारांवर मात्र त्याने गद्दारीचा नवा ठपका ठेवला. Chief minister Uddhav Thackeray steps down
पण त्याचबरोबर त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अडीच वर्षांची विधिमंडळ कारकीर्द ही संपुष्टात आणली आहे. अर्थात हे करताना उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे एक मराठी म्हण देखील बदलली आहे. ती म्हणजे “भरवशाच्या म्हशीला टोणगा” अशी मराठी म्हण आहे, ती बदलून ही मराठी म्हण बदलून “पवारांच्या भरवशावर टिकले अडीच वर्षे ठाकरे सरकार”, अशी म्हण तयार झाली आहे.
आपल्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीतून बाहेर पडताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांचे म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचे आभार मानले आणि आपल्याच माणसांनी दगा दिला म्हणून मला दुःख होते, असे सांगितले. माझे चुकले माकले माफ करा, असे ते म्हणाले. अर्थात अशा बातम्या आल्या. पण उद्धव ठाकरे यांनी जरी आपल्याच माणसांनी दगा दिला असा आक्रोश चालवला असला तरी गेल्या अडीच वर्षात ठाकरे – पवार सरकारच्या तिजोरीतून सगळ्यात जास्त माल कोणी नेला??, हे आकडेवारी सिद्ध करते आहे. निधी वाटपात 57% निधी राष्ट्रवादीला 34 % निधी काँग्रेसला आणि 16 % निधी शिवसेनेला, ही गेल्या अडीच वर्षातली स्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा सदनात जाहीररित्या मांडली होती!! त्यावर अजित दादांनी जास्त पैसा पगारावर खर्च होतो, असे सांगून पडदा टाकायचा प्रयत्न जरूर केला होता पण शिवसेनेतल्या 56 पैकी 39 आमदारांनी फुटून फडणवीसांच्याच विधानसभा सदनातल्या वक्तव्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.
शिवसेनेतल्या सगळ्याच आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि अर्थमंत्री अजित पवारांवर प्रचंड राग असल्याचे उघड दिसून आले आणि म्हणूनच शिवसेनेची सत्ता असताना आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे हे प्रचंड मोठ्या बंडात शिवसेनेच्या 39 आमदारांना सामील करू शकले, हे वास्तव मुख्यमंत्र्यांनी जरी नाकारले उद्धव ठाकरे यांनी जरी नाकारले तरी ते दृष्टीआड करून चालणार नाही.
शहाजी बापू पाटलांचे आज जे भाषण व्हायरल होत आहे ते 100 % सत्य आहे ज्या राजकीय घराण्यांनी पवारांची जवळीक साधली ती राजकीय घराणे संपली हेच शहाजीबापू पाटील गुवाहाटीतल्या हॉटेलमध्ये आमदारांसमोर बोलले होते. एकापाठोपाठ एक राजकीय घराण्यांची नावे घेऊन पवारांनी ती कशी संपवली याचे रसभरीत वर्णन शहाजी बापू पाटलांनी केले त्यामध्ये आता ठाकरे घराण्याची भर पडताना दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांचे भाषण जरी कितीही इमोशनल केले आणि त्यांनी अनेक सत्य जरी मांडली असतील तरी एक वस्तुस्थिती विसरून चालणार नाही. ती म्हणजे मुख्यमंत्री निधीच्या वाटपाबाबत आपल्या आमदारांचे समाधान करू शकले नाहीत. शिवसेनेच्या ग्रामीण भागातल्या आणि निमशहरी भागातले आमदारांचा खरा संघर्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. त्यांचे राजकीय अस्तित्व आणि राजकीय लढा राष्ट्रवादी काँग्रेसशी दिल्याखेरीज त्यांना पर्याय नाही ही राजकीय वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनी नजरेआड केली ही बाब नाकारता येणार नाही.
उद्धव ठाकरेंनी जरी आपल्याला साथ दिली म्हणून शरद पवारांना आणि सोनिया गांधींना श्रेय दिले असले तरी त्यांच्या पाठिंब्यावरचे सरकार उद्धव ठाकरे फक्त अडीच वर्षे चालवू शकले ही दारूण असली आणि उद्धव ठाकरेंना अमान्य असली तरी महाराष्ट्राच्या इतिहासातली ठळक आणि अधोरेखित करणारी वस्तुस्थिती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App