Uddhav Thackeray : आंदोलनासाठी केले ठाकरेंना “पुढारी”; पण त्यांनी मुख्यमंत्री पद मागताच पवार + काँग्रेसचे पाऊल माघारी!!

Uddhav Thackeray

नाशिक : Uddhav Thackeray  उग्र आंदोलनासाठी केले उद्धव ठाकरेंना “पुढारी”; पण त्यांनी मुख्यमंत्री पद मागताच शरद पवार आणि काँग्रेसचे पाऊल माघारी!!, असेच महाविकास आघाडीतले राजकारण रंगले. Uddhav Thackeray leadership for agitation only

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीने आज (रविवार, १ सप्टेंबर) जोडे मारा आंदोलन केले. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे अनेक नेते येथे उपस्थित होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत सर्वांत आक्रमक भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

जोडे मारा आंदोलन महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांचे होते. पण त्यामध्ये संख्याबळ उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनीच भरले होते. त्यामुळे आंदोलनाचे पुढारपण उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. उलट महायुतीच्या सरकारचा उद्धव ठाकरे आपल्या हातातल्या काठीने मारत असल्याची त्यांनी मजा पाहिली.

पण याच उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी महाविकास आघाडीच्या पहिल्या मेळाव्यात मुख्यमंत्री जाहीर करण्याची मागणी केली होती, त्यावेळी मात्र शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्या होत्या. आंदोलनात गर्दी जमवायला, उग्र आंदोलन करायला उद्धव ठाकरे आणि त्यांचे शिवसैनिक पाहिजेत, पण प्रत्यक्ष सत्तेचा वाटा देताना किंवा थेट मुख्यमंत्रीपद देताना उद्धव ठाकरे नकोत, अशीच काँग्रेस आणि पवारांची छुपी भूमिका यातून उघड दिसली.

उद्धव ठाकरेंनी अतिशय आक्रमक भाषण केले त्यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना तडाखे लगावले. त्या तुलनेत शरद पवारांचे आणि नाना पटोले यांचे भाषण फारच सौम्य ठरले.


Raj Thackeray : कोर्टात वारंवार गैरहजेरीमुळे राज ठाकरेंविरुद्ध अटक वॉरंट; 2008 मध्ये कार्यकर्त्यांकडून बसवर दगडफेकीचा खटला


उद्धव ठाकरे म्हणाले :

माझ्यासाठी आणि सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नसून ते आमचे आराध्यदैवत आहेत. पण सत्ताधारी आमच्यावर टीका करत आहेत की आम्ही राजकारण करत आहोत. पण ते राजकारण करत नसून गजकर्ण आहे. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालंय. खाजवत बसत आहेत. पण या चुकीला माफी नाही. आम्ही मुद्दाम मनातील संताप व्यक्त करण्यासाठी “गेट वे ऑफ इंडिया” म्हणजे देशाचं प्रवेशद्वार येथे जमलो आहे. हे शिवद्रोही सरकारला बेकायदा सरकारला “गेट आऊट ऑफ इंडिया” (Get करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहेत.

पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले आणि माफी मागितली. माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवले नसते. पण माफी मागतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने मागितलेली माफी आम्हाला मान्य नाही. व्यासपीठावर एक शाहाणा, दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल – दोन हाफ बसले होते. त्यातला एक हाफ हसत होता. महाराजांची तुम्ही एवढी थट्टा करता!!

निवडणुकीसाठी तुम्ही सिंधुदुर्गात आला होता. आम्हाला अभिमान वाटला होता की नौदल दिन माझ्या महाराष्ट्रातील किनारपट्टीवर साजरा होत आहे. हा कार्यक्रम दिमाखदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्ट्राचार करून पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल.

पवारांची सौम्य टीका

उद्धव ठाकरे यांच्या आक्रमक भाषणामुळे जोडे मारा आंदोलनात जोश भरला. पण शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत सौम्य भाषण केले. मालवण मधला पुतळा हा भ्रष्टाचाराचा नमुना असल्याची टीका त्यांनी केली. राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला. मालवण मधला पुतळा उभा करताना त्यात भ्रष्टाचार झाल्याचा समज जनमानसात पसरला. शिवप्रेमींचा अपमान सरकारने केला. त्यामुळे सरकारचा निषेध करण्याची भूमिका आम्ही घेतली, अशी टीका पवारांनी केली.

नाना पटोले यांनी त्यांचा जुनाच पेशवाईचा मुद्दा उकरून काढला, पण प्रत्यक्षात आंदोलनातले संख्याबळ शिवसैनिकांचे होते आणि आंदोलनाचे पुढारीपण उद्धव ठाकरेंकडे होते. आंदोलनापुरते ठाकरेच नेते; पण मुख्यमंत्रीपदावरून मागे घेतले…, हेच यातून दिसले!!

Uddhav Thackeray leadership for agitation only

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात