वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या 16 बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कायदेशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या 16 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी शिवसेनेने अॅड. देवदत्त कामत यांच्यामार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर आता शिंदे गटानेही सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या याचिकेला चॅलेंज करणारी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता शिंदे गटही कायदेशीर कारवाईला तयार असल्याचे स्पष्ट झाले आहे. Uddhav Thackeray group × Eknath Shinde group battle; Hearing in the Supreme Court tomorrow
कायदेशीर लढाईला सुरुवात
शिंदे गटातील 16 आमदारांनी घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सर्व आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी या याचिकेत केली आहे. पण याविरोधात आता शिंदे गटानेही याचिका दाखल केली असून, या याचिकेवर सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा आणि एकनाथ शिंदे यांच्या गटनेते पदाबाबत ही याचिका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही लढाई आता कायद्याच्या चौकटीत लढली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाला मान्यता नाही
दोन-तृतीयांश बंडखोर आमदारांचं संख्याबळ असल्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येणार नाही, अशी माहिती सध्या पसरवण्यात येत आहे. पण दोन-तृतीयांश सदस्यांचे संख्याबळ तेव्हाच ग्राह्य धरले जाते जेव्हा या सदस्यांचा गट दुस-या गटात समाविष्ट होतो. शिंदे गटाकडून अशाप्रकारचे कुठलेही विलीनीकरण करण्यात आलेले नाही, त्यामुळे त्यांच्या गटाला अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत मान्यता नाही. जोपर्यंत शिंदे गट कुठल्याही पक्षात सहभागी होत नाही तोपर्यंत त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे वकील अॅड.कामत यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App