विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उसने अवसान आणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बरसले आहेत. मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है? असे म्हणताना पुलोदची दगाबाजी म्हणत त्यांनी शरद पवारांवरही घसरले आहेत.Uddhav Thackeray
अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयमवर शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, अमित शाह परत उद्या येतायत. त्यांचा समाचार तर घेणार,मी सोडणार नाही.पाठीत वार केला की वाघ नखं आम्ही काढू..मिठी मारली तर प्रेमाने मारू दगाबाजी केली तर वाघनखं काढू…1978 साली पुलोदच्या दग्गाबाजीमध्ये भाजप सुद्धा होता. त्याला खतपाणी तुम्ही दिला त्यात चेंबूरचे हशू अडवणी सुद्धा होते. दग्गाबाजीचे बीज तुमच्यात आहेत अमित शाहजी..90 हजार आरएसएसचे लोकं आता कामाला येणार आहे का? तो रक्तदान करेल कीं गोमूत्र दान करेल? पुलोदची दगाबाजी म्हणताना उध्दव ठाकरे हे विसरले की आज ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत ते शरद पवारच पुलोद म्हणजे पुरोगामी लोकशाही आघाडीचे शिल्पकार होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज उपनगरात आपण सभा घेतोय, अडचणीची जागा आहे. वांद्रेला गद्दारांचा मेळावा सुरु आहे, आपली सभा झाल्यानंतर ते चिरकतील. महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध हे गद्दार करत आहेत. गद्दारांना जिंकवणारे अमित शाह आहेत. महापालिका होऊ द्या. मग यांची काय विल्हेवाट होते बघा..आता बसायच तर बसा नाही तर घरी निघून जा…रुसू बाई रुसू कोपऱ्यात जाऊन बसू..गावात जाऊन बसू डोळ्यातले अश्रू त्यांच्या डोळ्यात दिसताय. आपण गाफिल राहिलो त्याचा फायदा त्यांनी घेतला..
ठाकरे म्हणाले, पहिली पोटनिवडणूक 1987 साली लढली, ती देशातील हिंदूत्वाच्या मुद्द्यावर लढलेली पहिली निवडणूक होती. त्यावेळी शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने होते. गुजरातमधून शंभू महाराज होते. त्यावेळी बाळासाहेबांची स्पष्ट भूमिका आहेत. पाकिस्तान धार्जिणा मुस्लिम आमचा नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App