विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या मातीत आणली पवारांची कॉपी; कोण, कुणाच्या हातात काय देणार??, अशी विचारणा केली. Uddhav thackeray copied sharad pawar’s 1995 speech in 2024 in kolhapur
त्याचे असे झाले :
कोल्हापूरच्या गांधी मैदानात आज काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांची जंगी प्रचार सभा झाली. त्या सभेत काँग्रेसचे नेते, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मुख्य भाषणे झाली. पण उद्धव ठाकरेंनी शेवटी भाषण करताना पवारांच्या एका जुन्याच भाषणाची कॉपी हाणली.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अतिशय जातीयवादी विधान करत त्यावेळी तुम्ही फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र जोशी – महाजनांच्या हातात देणार का??, असा सवाल केला होता. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात होते. त्यांनी भाजप बरोबर युती करून त्यावेळी अखंड काँग्रेस असलेल्या पक्षाच्या सरकारपुढे खऱ्या अर्थाने आव्हान उभे केले होते. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे खरे आव्हान शरद पवारांपुढेच उभे होते. परंतु, पवारांनी धूर्तपणे ते आव्हान “डिफ्लेक्ट” केले आणि त्यावेळी ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि प्रमोद महाजन यांचा जातिवादी उल्लेख करत शरद पवारांनी मतदारांना तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र जोशी – महाराजांच्या हातात देणार का??, असा सवाल विचारला होता.
उद्धव ठाकरेंनी पवारांच्या 1995 च्या भाषणाची कॉपी 2024 मध्ये कोल्हापूरच्या भूमीत हाणली. फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आणि देश तुम्ही मोदी – शाहांच्या हातात देणार का?? असा सवाल केला. मोदी आणि शाह हे सगळा देश त्यांच्या मित्रांना विकायला निघाले आहेत. एकही सरकारी संस्था त्यांनी विकायची ठेवली नाही. त्यांनी संपूर्ण देशाची लूट चालवली आहे. एक सब पर भारी आणि बरोबर सगळे भ्रष्टाचारी अशी मोदी आणि शाहांची अवस्था आहे. म्हणून विचारतो, तुम्ही सगळा देश आता मोदी शहांच्या हातात देणार का??, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरच्या मतदारांना शरद पवारांच्या जुन्या भाषणाची कॉपी हाणली.
पवारांनी 1995 मध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र तुम्ही जोशी – महाजनांच्या हातात देणार क??, असा सवाल केला होता, पण महाराष्ट्राच्या मतदारांनी पवारांची जातिवादी टिप्पणी वेगळ्या प्रकारे मनावर घेतली आणि खरंच पवारांच्या हातात असलेला महाराष्ट्र काढून घेऊन तो जोशी – महाजन यांच्याच हातात सोपवला होता.
मग आता उद्धव ठाकरे यांनी पवारांची कोल्हापूरच्या मातीत वेगळ्या प्रकारे कॉफी हाणून तुम्ही देश मोदी – शाहांच्या हातात देणार का??, असा सवाल विचारल्यानंतर संपूर्ण देशातले मतदार काय करतील??,… हे येत्या 4 जून रोजी समजणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App