नाशिक : वयाच्या ५१ व्या वर्षी दिल्लीत जाऊन पंतप्रधानपदासाठी मारलेली उडी ८१ व्या वर्षी दिल्लीतच संयोजकपदाच्या कुंपणातच पडणार आहे…!! ही अवस्था आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची.Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra
शरद पवारांनी काँग्रेसला वगळून आज ज्या १५ प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची, लिबरल्सची आणि ल्यूटन्स दिल्लीतल्या पत्रकारांची बैठक बोलवली आहे, तिच्यात शरद पवारांच्या तिसऱ्या आघाडीच्या संयोजकपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला वगळून होणाऱ्या या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीत थेट अध्यक्षपदाचा आणि पर्यायाने पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता नाही. आणि असलीच, तर पश्चिम बंगालच्या फायरब्रँड मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेच नाव त्या पदासाठी आघाडीवर असण्याची शक्यता आहे.
पण या सगळ्यामध्ये पवारांच्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचे आणि अनुभवाचे सार आले आहे. शरद पवारांनी वयाच्या ५१ व्या वर्षी दिल्लीत जाऊन थेट पंतप्रधानपदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला होता. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांना एकदम पंतप्रधान व्हायचे होते. त्यांनी सुरेश कलमाडींच्या घरातून आपल्या उमेदवारीची अनौपचारिक घोषणा करून पी. व्ही. नरसिंह रावांना आव्हान दिले होते. पण नरसिंह रावांनी त्यांना असा काही धोबीपछाड दिला की पंतप्रधानपद तर दूरच पण पुढच्या चार वर्षांमध्ये अशा काही घडामोडी घडल्या की पवारांचे मुख्यमंत्रीपद पण गेले.
त्यानंतर बऱ्याच तडजोडी – गठजोडी करून पवारांनी मुंबई आणि दिल्लीत दुय्यम – तिय्यम स्थानावर आपले अस्तित्व टिकवून धरले. ते नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री झाले. पण ते पद त्यांना अवघे पावणे दोन वर्षेच लाभले. मुंबई दंगलींनंतर पवारांना नरसिंह रावांनी महाराष्ट्र सावरण्यासाठी मुख्यमंत्री करून पाठवून दिले. पवारांच्या नेतृत्वाखाली १९९५ मध्ये अखंड काँग्रेसचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत पराभव झाला. आणि त्यानंतर २००४ पर्यंत पवारांना विरोधी पक्षातच बसावे लागले.
मग भले १९९९ साली त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना करून महाराष्ट्रात काँग्रेसशी तडजोड करून सत्ता मिळविली असेल. पवारांना महाराष्ट्रात देखील काँग्रेस खालोखाल दुय्यम स्थान स्वीकारावे लागले आहे.
२००४ ते २०१४ अशी १० वर्षे शरद पवार केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नवव्या क्रमांकाचे कृषिमंत्रीपद स्वीकारून बसले होते. २०१४ नंतर ते पुन्हा विरोधकांमध्येच जाऊन बसलेले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर आघाडी करून गेली १८ महिने पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दुय्यम स्थानीच आहे.
आणि आता पवार हे प्रशांत किशोर यांच्या मदतीने तिसऱ्या आघाडीची प्रादेशिक पक्षांची मोट बांधत आहेत. प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जींचे दूत म्हणून त्यांच्याकडे पोहोचले होते. त्यावेळीच कदाचित तिसऱ्या आघाडीचा निर्णय झाला होता असे मानण्यास वाव आहे. ममता बॅनर्जींना पवारांची ज्येष्ठता मान्य आहे. त्यामुळेच त्यांचे आजच्या बैठकीत तिसऱ्या आघाडीचे संयोजकपद जाहीर होण्याची शक्यता आहे. पण संयोजकांच्या पुढचे म्हणजे नेतृत्वाचे पद विविध राजकीय कारणांमुळे ममतांनाच मिळण्याची शक्यता आहे.
म्हणजेच खुद्द पवारांनी वयाच्या ५१ व्या वर्षी दिल्लीत जाऊन पवारांनी पंतप्रधानपदासाठी मारलेली उडी ही काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीच्या संयोजकपदाच्या कुंपणातच पडण्याची शक्यता आहे… दाट शक्यता आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App