विशेष प्रतिनिधी
मुंबई – ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानासह चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या दोघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बॉम्ब पेरल्याचा निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा ‘माझ्याकडे होती ती माहिती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करू नका,’ असे सांगून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला होता. त्यानंतर हा फोन बंद लागत होता. Two people arrested for hoax call
‘मोबाईल लोकेशन’च्या आधारे पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. राजू अंगारे आणि रमेश शिरसाट अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींतील एक जण ट्रकचालक आहे. हे दोघेही डोंबिवलीत राहणारे आहेत. या दोघांनी दारूच्या नशेत हा धमकीचा दूरध्वनी केल्याची बाब उजेडात आली आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा आणि दादर रेल्वे स्थानक, तसेच अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला होता. दूरध्वनीवरून धमकी आल्यानंतर पोलिसांनी तपास मोहीम हाती घेण्यात आली. या शोध मोहिमेत ‘एटीएस’चे पथक, शीघ्र कृती दल तसेच स्थानिक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र चारही ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App