अमेरिकेकडून भारताला कोरोना प्रतिबंधक लशीचे ७५ लाख डोस, आणखी डोसची मागणी


 

वॉशिंग्टन – अमेरिकेने भारताला आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लशीचे केवळ ७५ लाख डोस दिले आहेत. भारताला आणखी डोस देण्याची मागणी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील भारतीय वंशाचे सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी केली. USA gave 75 lack doses to India

भारत व अन्य देशांसाठी लसीकरण मदत मोहिमेचा विस्तार करण्याचा प्रयत्न कृष्णमूर्ती करीत असून त्यासाठी अमेरिकेच्या दोन्ही सभागृहांमधील ११६ सदस्यांचा पाठिंबा त्यांनी मिळविला आहे.कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका जगासमोर असताना लसीकरण मदत कार्यक्रमाचा विस्तार करण्यासाठी जास्त डोस दिले पाहिजे, अशी विनंती त्यांनी बायडेन प्रशासनाला केली.

कृष्णमूर्ती म्हणाले की, जोपर्यंत कोणत्याही देशात कोरोनाचे अस्तित्व असेल, तोपर्यंत संपूर्ण जगाला विषाणूच्या नव्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. या पार्श्वेभूमीवर आपण कोरोनामुक्तीची घोषणा करणे आवश्याक आहे.

म्हणूनच लशीच्या अब्जावधी डोसचे उत्पाोदन आणि वितरणासाठी आवश्याक आंतरराष्ट्रीय भागीदारी करून या साथीचा नायनाट करण्याची गरज आहे. जगातील प्रमुख लोकशाही देशांनी आणि या जीवरक्षक लशींच्या उत्पादकांनी सातत्याने सहकार्य करायला हवे.

USA gave 75 lack doses to India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात