छत्रपती संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी; वाचा Inside Story!!

two group clashesh maratha samaj meeting in sambhaji nagar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची एकजूट दिसली पाहिजे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अपक्ष मराठा उमेदवार देण्याचा मानस मनोज जरांगे यांनी अंतर्वली सराटीच्या बैठकीत बोलून दाखवला होता. गावागावांत जाऊन बैठका घ्या. तुम्ही एकमत करा आणि मराठा समाजाची मते एकवटण्यासाठी एकच उमेदवार उभा करा. तशा सूचना द्या. त्यानंतर आपण 30 तारखेला अंतिम निर्णय घेऊ, असे मनोज जरांगे त्या बैठकीत म्हणाले होते. त्यानंतर गावागावांमध्ये, शहरा शहरांमध्ये मराठा समाजाने बैठका सुरू केल्या. त्यापैकी एक बैठक छत्रपती संभाजी नगर मध्ये झाली, पण त्या बैठकीत प्रचंड वाद होऊन प्रकरण हाणामारी पर्यंत गेले. 60-70 लोक उपस्थित असलेल्या या बैठकीत एकमत होण्याऐवजी बेदिली माजली आणि त्याची बातमी राज्यभर पसरली. two group clashesh maratha samaj meeting in sambhaji nagar

छत्रपती संभाजी नगरच्या बैठकीत यावेळी तुंबळ हाणामारी झाली. विकी पाटील नावाच्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. हा वाद का उफाळून आला??, त्याचे कारण समोर आले.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाची चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मराठा मंदिरात बैठक बोलवण्यात आली. ही बैठक सकाळी 11.00 वाजता सुरू झाली. या बैठकीला 60 ते 70 मराठा समुदायातील महिला आणि पुरुष उपस्थित होते. बैठक सुरू झाली. चर्चा सुरू असतानाच आरोप-प्रत्यारोप झाले आणि विकी पाटीलला काही जणांनी मारहाण केली.

छत्रपती संभाजी नगरचा मराठा उमेदवार एकमताने ठरवताना कुणीही कुणाचे नाव घ्यायचे नाही. काही मतभेद निर्माण झाले, तर मनोज जरांगे यांच्याकडे जायचे, असे ठरले. पण बैठकीत एका व्यक्तीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचे नाव घेत आरोप केला. त्यानंतर ज्याच्यावर हा आरोप करण्यात आला. त्याला जाब विचारताना वाद वाढला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.

आम्हाला काही व्यक्तींकडून माहिती मिळाली होती की, हा माणूस सुपारी घेऊन आला आहे. आम्ही त्याला जाब विचारला. जाब विचारत असताना त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यात खाली बसलेल्या कुणीतरी चंद्रकांत खैरेंचे नाव घेतले आणि सांगितलं की पैसे घेऊन पाठवण्यात आले आहे. पण, आम्ही त्याला जबाब विचारला की, हे खरं आहे का? तो खाली बसून बोलत होता. त्यातून हे घडले, असा खुलासा त्या बैठकीत उपस्थित राहिलेल्या एका व्यक्तीने केला.

पण, प्रत्यक्षात आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. या प्रस्थापित लोकांनी थेट मारहाण सुरू केली. आम्ही गरजवंतांची नावे टाकत होतो. ही यादी मनोज जरांगे यांच्याकडे पाठवायची होती. पण प्रस्थापितांनीच मला मारहाण केली, असा खुलासा मारहाण झालेल्या विकी पाटीलने केला.

two group clashesh maratha samaj meeting in sambhaji nagar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात