businessman commits suicide : कोरोना महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर दूरगामी परिणाम केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन कामाला आलं, परंतु ज्यांचं हातावर पोट आहे अशांचं इकडे आड आणि तिकडे विहीर असं जिणं झालं आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या जळगावातील रेडिमेड कापड दुकान व सलून व्यावसायिकांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. Two businessman commits suicide due to financial crisis because of lockdown in Jalgaon
विशेष प्रतिनिधी
जळगाव : कोरोना महामारीमुळे प्रत्येक क्षेत्रावर दूरगामी परिणाम केला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन कामाला आलं, परंतु ज्यांचं हातावर पोट आहे अशांचं इकडे आड आणि तिकडे विहीर असं जिणं झालं आहे. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्याने आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या जळगावातील रेडिमेड कापड दुकान व सलून व्यावसायिकांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.
पहिली घटनेत संजय चिरमानी (वय 35) यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. संजय यांचे फुले मार्केटमध्ये रेडिमेड कपडे विक्रीचा एका छोटासा गाडा होता. पण लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. यातच व्यवसाय सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी सावकरांनी तगादा लावला. एकाच वेळी चहुबाजूंनी आलेल्या संकटामुळे संजय चिरमाणी यांनी टोकाचे पाऊल उचलले आणि त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.
लॉकडाऊनमुळे बिकट आर्थिक परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे जळगावातील सलून व्यवसायिक गजानन कडू वाघ (वय 35, रा. लक्ष्मीनगर) यांनी आत्महत्या केली आहे. गजानन वाघ लक्ष्मीनगरात पत्नी व दोन मुलांसह राहत होते. कोरोनामुळे सलून दुकानांवर निर्बंध लादलेले असल्याने त्यांच्या हाताला काम नव्हते. सुरुवातीच्या काळात मालकाकडून काही मदत मिळाली, परंतु नंतर तीही बंद झाली. लॉकडाऊन वाढतच गेले तसे वाघ यांची आर्थिक परिस्थिती आणखी ढासळली. त्यामुळे त्यांनी उसनवारी करून घरखर्च भागवण्याचा प्रयत्न केला. परंतु परिस्थिती सुधारली नाही. अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
Two businessman commits suicide due to financial crisis because of lockdown in Jalgaon
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App