‘’पंधरा दिवसांत दोन मोठे राजकीय स्फोट होणार’’ प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा!

राजकीय वर्तुळात खळबळ तर सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांमध्ये चर्चांना उधाण

विशेष प्रतिनिधी

पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात काहीशा नाट्यमय घडामोडी घडताना दिसून आहे. त्याचबरोबरीने महाविकास आघाडीतही सारंकाही नक्कीच आलेबेल नसल्याचंही वेळोवेळी दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची विशेषता शरद पवार आणि अजित पवार यांची विविध मुद्य्यांवरील विधानं पाहता लवकरच काहीतरी मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात आता प्रकाश आंबेडकरांच मोठं विधान समोर आलं आहे.  Two big political explosions will happen in the state in fifteen days Prakash Ambedkars big claim

‘’पंधरा दिवसांत बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रात होईल. तेव्हा आपण १५ दिवस वाट पाहूयात. मी एवढंच बोलतोय पंधरा दिवस जरा थांबा. देशात दोन ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होतील.’’ असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.

प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांपासून ते राजकारण्यांमध्येही जोरदार चर्चांना उधाण आलं आहे.  प्रकाश आंबेडकरांनी ते दोन राजकी स्फोट नेमके कोणते असणार हे जरी स्पष्ट केलं नसलं, तरी हे स्फोट नक्कीच होणार असल्याच त्यांनी म्हटलं आहे.

Two big political explosions will happen in the state in fifteen days Prakash Ambedkars big claim

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात