विशेष प्रतिनिधी
मुंबई : ट्रम्पेट उर्फ पिपाणी चिन्हाचा पवारांचा पक्ष करतोय बाऊ, पण आमदारांची संख्या वाढली असती फक्त 10 + 9…!!, हीच वस्तुस्थिती विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातल्या फक्त 9 जागांवर ट्रम्पेट उर्फ पिपाणी चिन्हाचा फटका बसला असे आकडेवारीतून दिसते. Trumpet vs tutari sharad pawar party objection
महाराष्ट्रातल्या तब्बल 160 विधानसभा मतदारसंघांमध्ये कुठल्या ना कुठल्या उमेदवाराला ट्रम्पेट उर्फ पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगाने दिले होते, त्यापैकी फक्त 9 मतदारसंघामध्ये ट्रम्पेट उर्फ पिपाणी चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना शरद पवारांच्या पक्षाच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाल्याचे दिसून आले. म्हणजे ट्रम्पेटला मिळालेली मते शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली असती, तर या 9 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले असते, असे बोलले जात आहे. पण याचा अर्थ शरद पवारांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 10 + 9 = 19 एवढीच झाली असती. म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ट्रम्पेट उर्फ पिपाणी या चिन्हाची मते मिळवून देखील फार मोठा तीर मारता आला नसता, असा याचा अर्थ होतो.
लोकसभा निवडणुकीतही सातारा तसेच इतर लोकसभा मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत शहापूर, बेलापूर, केज, परंडा, अणुशक्तीनगर, जिंतूर, घनसावंगी, आंबेगाव, पारनेर, या विधानसभा मतदारसंघांत शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे, त्यापेक्षा अधिक मते ट्रम्पेट उर्फ पिपाणी हे निवडणूक चिन्ह असलेल्या उमेदवाराला मिळाली.
कोणत्या मतदारसंघात बसला फटका?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App