विशेष प्रतिनिधी
धुळे : शिरपूर तालुक्यातील जैतपुर परिसरातील १२ मोर मृत्युमुखी डल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली आहे. शिरपूर तालुक्यात प्रथमच मोठ्या संख्येने मोरांचा मृत्यू झाल्याने वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ तर वन विभागात खळबळ उडाली आहे. Tragic death of twelve peacocks in Jaitpur area
जैतपुर परिसरात बागायती क्षेत्र जास्त आहे.तसेच बारमाही पिके जास्त प्रमाणात घेतल्याने अन्न व पाणी मुबलक आहे. या परिसरात अनेक मोर वास्तव्यात आहेत.सध्या खरीपाचा हंगाम सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. पेरण्या किंवा बिया लावण्याअगोदर रोप, बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते.तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वनविभागाचे हिसाळे, वनपाल कपिल पाटील, वनरक्षक मुकेश गुजर,वन्य प्राणीमित्र योगेश वारुळे अभिजित पाटील,महेश करंकाळ आदी अधिकारी व कार्यकर्ते यांनी पाहणी केली. तर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश बारी,पशु सहाय्यक डॉ. दिलीप गोरे यांनी तपासणी करून अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथदर्शनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App