राज्य सरकारच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. मात्र, व्यापारी संघटनानं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.Trade unions opposed the decision of the Marathi government’s state government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं बुधवारी घेतलाय.
राज्य सरकारच्या आदेशात अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येईल, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय. मात्र, व्यापारी संघटनानं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स अँड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा म्हणाले की, “दुकानांच्या फलकावर मराठी शब्द लिहिण्यास हरकत नाही. मात्र, दुकानाच्या फलकावर मराठी नाव लावताना फॉन्टचा आकार अधिक असावा. दुकानांमध्ये मराठी नावे लिहिण्यास आमचा विरोध नाही. परंतु मराठी नावे देताना फॉन्ट्सबाबत निर्णय घेतला जात आहे”.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App