संमतीशिवाय शरीराला हात लावणे स्त्रीचा अपमान, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विशेष प्रतिनिधी

मुंबई : संमतीशिवाय एखाद्या पुरुषाने महिलेच्या शरीराला हात लावणे हा स्त्रीचा अपमान असून हा विनयभंगाचा गुन्हा असल्याचा निवार्ळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जालनातील एका केससंदर्भात निकाल देताना एका 36 वर्षीय पुरुषाची शिक्षेला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.Touching a body without consent is an insult to a woman, Mumbai High Court rules

न्यायाधीश मुकुंद सेविलकर यांच्या एकल खंडपीठाने 21 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशात परमेश्वर ढगे यांनी जालना सत्र न्यायालयाच्या 21 आॅगस्टच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देत याचिका निकाली काढली. सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्या व्यक्तीला आयपीसी कलम 451 आणि 351-अ अंतर्गत दोषी ठरवले होते.



पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, 4 जुलै 2014 रोजी ती तिच्या आजीसोबत घरात एकटी होती. तिचा नवरा काही कामानिमित्त गावी गेला होता. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी तिच्या घरी आला आणि पती गावावरून कधी परतणार अशी विचारणा करू लागला. पीडितेने सांगितले की, तिचा नवरा रात्री घरी येणार नाही.

यानंतर रात्री 11 वाजता हा व्यक्ती महिलेच्या घरात घुसला. पीडिता झोपली होती. अचानक कोणीतरी तिच्या पायाला हात लावत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले. ती तडक उठली आणि तिने पाहिले की तो व्यक्ती तिच्या खाटेवर बसला होता.

पीडित तरुणी आणि तिच्या सासूने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. पीडितेने तातडीने फोन करून हा प्रकार पतीला सांगितला. सकाळी पती येताच पीडितेने संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

दोषी व्यक्तीच्या बाजूने, त्याच्या वकिलाने न्यायालयात युक्तिवाद केला की, महिलेने घराचा दरवाजा आतून बंद केला नव्हता. यावरून त्याचा अशील महिलेच्या संमतीने घरात शिरला होता, असे सूचित होते. साधारणत: घरात पुरुष नसताना घरातील महिला नीट दार लावून घेतात.

याशिवाय संबंधित व्यक्तीने कोणत्याही अश्लील हेतूने महिलेच्या पायाला हात लावलेला नाही, असा युक्तिवादही वकील प्रतीक भोसले यांनी केला. तक्रार दाखल करण्यास 12 तास उशीर झाल्याबद्दलही वकिलाने प्रश्न केला.

सर्व युक्तिवाद आणि म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, याचिकाकत्यार्ने महिलेच्या इज्जतीला हात घालण्याचे काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात याचिकाकर्ता पीडितेच्या पायाजवळ बसलेला आढळून आला.

एवढेच नाही तर पीडितेच्या कॉटवर बसून तो तिच्या पायाला हात लावत होता. या वर्तनातून अश्लील हेतू उघड होतात. अन्यथा, याचिकाकत्यार्ने मध्यरात्री पीडितेच्या घरी अशाप्रकारे घुसण्यासाठी इतर कोणतेही कारण दिसत नाही.

आरोपी मध्यरात्री पीडितेच्या घरी का गेला याचे समाधानकारक उत्तर याचिकाकर्ता देऊ शकला नाही. पीडितेच्या पतीच्या गैरहजेरीचा फायदा घेत याचिकाकत्यार्ने मुद्दाम अश्लील हेतूने घरात प्रवेश केला होता. त्यामुळे पीडितेच्या अब्रूवर हात घातल्याप्रकरणी ट्रायल कोटार्ने त्याला दोषी धरत कोणतीही चूक केली नाही, असे न्यायमुर्ती म्हणाले.

Touching a body without consent is an insult to a woman, Mumbai High Court rules

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात