विशेष प्रतिनिधी
जालना : Manoj Jarange विधानसभा इच्छुक उमेदवारांशी उद्या सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मी चर्चा करणार आहे. ज्या बांधवांनी अर्ज केले आहे, त्यांनी उद्या चर्चेसाठी यावे. पण उद्या चर्चेला आलेल्यांनी आपले तिकीट फायनल झाले असू समजू नये, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेणार, असे त्यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, 20 तारखेच्या आंतरवालीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये आपण समाजातील बांधवांना आपण उमेदवार पाडायचे का उभे करायचे याबद्दल विचारणा करणार आहोत आणि त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कागदपत्रे तयार ठेवा
मनोज जरांगे म्हणाले की, 20 तारखेला जर लढायचे ठरले तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 3 दिवस मिळतील त्यामळे निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे सर्वांनी तयार ठेवावी. जर पाडायचा निर्णय झाला तर होऊन होऊन काय होईल की कागदपत्रासाठी केलेला खर्च वाया जाईल. लढायचे ठरो की पाडायचे ठरले तरी आपण सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देणार आहोत.
महायुतीने हीन वागणूक दिली
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांचे वाटोळे करुन तुम्हाला आम्ही पुढे जाऊ देणार नाही. मविआंच्या नेत्यांपेक्षा महायुतीने मराठा समाजाला हीन वागणूक दिली आहे. सत्ताधाऱ्यांचे मागे ओबीसी उभे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, पण त्यांना कोण निर्णय घेऊ देत नाही हे समजत नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App