विशेष प्रतिनिधी
मालेगाव : मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टीपू सुलतानचा फोटो लावल्याने राज्यात मोठा वादंग झाला. या फोटोला भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध केला. मोठा राजकीय राडा झाल्यानंतर उपमहपौरांच्या दालनातून टीपू सुलतानचा फोटो हटवण्यात आला. मात्र मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्या बाजूने “बळ” दिल्यानंतर मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा पुन्हा हा फोटो लावण्यात येणार आहे. Tipu Sultan
टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावणार
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे की, कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो दालनात पुन्हा लावण्यात येईल..असे वक्तव्य शान ए हिंद यांनी एका स्वागत समारंभात केले. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाद उफाळणार आहे.
मालेगाव शहरातील किल्ला परिसरात आयोजित स्वागत कार्यक्रमात भाषण करताना उपमहापौर शान ए हिंद यांनी पुन्हा एकदा टिपू सुलतान यांचे कौतुक केले. तसेच, त्यांचा फोटो लावणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी म्हटले. देशभरात टिपू सुलतान यांच्या संदर्भातील वाद आणि विविध विधानांमुळे निर्माण झालेला गदारोळ अद्याप शांत झालेला नसतानाच उपमहापौर यांचे हे दुसरे विधान समोर आले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
– टिपू सुलतानने मंदिरे सुरक्षित ठेवल्याचा दावा
टिपू सुलतान यांनी हिंदू- मुस्लीम असा भेदभाव केला नाही. त्यांनी महिलांना संरक्षण दिले. त्यांनी हिंदूंचाही विचार केला, मुस्लिमांचाही विचार केला. मंदिरे सुरक्षित ठेवली, मश्चिदीही सुरक्षित ठेवल्या. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला जाईल, असं उपमहापौर शान ए हिंद यांनी म्हटलं आहे. आता त्यांच्या या विधानावरुन नव्याने वाद पेटणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App