नक्षलवादाला खतपाणी घालणाऱ्या या व्यक्ती राजकीय विरोधक असल्याचे भासवले जाते. खरे तर त्या घटना विरोधी आहेत. मग ते वरावरा राव असो की तेलतुंबडे, असे महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले. “Those feeding Naxalism, are said to be a ‘political opponent’. In fact, they are anti-constitutional…whether its Varavara Rao or Teltumbade,” clarified former Maharashtra Director General of Police Praveen Dixit.
प्रतिनिधी
पुणे : “खोट्या नावाने मेल पाठवायचे, वादंग निर्माण करायचे. विदेशातून मदत आणि शस्त्रास्त्रे मिळवायची आणि मग लोकशाहीच्या मदतीनेच लोकशाहीतून निवडून दिलेल्या पंतप्रधानांचा खून कसा करायचा याचे डावपेच आखायचे. ही नक्षलवाद्यांची वृत्ती आहे. ही कसली राजकीय सभ्यता,” असा प्रश्न राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी उपस्थित केला.
“अशा व्यक्तींनी समाजात असा दबाव निर्माण केला की त्यांच्याविरूद्ध काही बोललो तर आपण गुन्हेगार ठरू असे सामान्यांना वाटते. पण आपण गुन्हेगार नाही. यांच्याविरूद्ध आवाज उठवायला हवा. स्वत:च्या हितासाठी विरोधही करायला हवा,” असे दीक्षित यांनी स्पष्ट केले. विवेक विचार मंच, तरुण भारत आणि अधिवक्ता परिषदेतर्फे ‘शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला’
या पुस्तकाचे प्रकाशन दीक्षित आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) पुण्यात झाले. त्यानंतर ते बोलत होते. लेखक भरत अमदापुरे, अधिवक्ता परिषदचे शहर सचिव ॲड. सागर सातपुते, तरुण भारतचे किरण शेलार, रविराज बावडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, “दुर्गम भागातील नक्षलवाद्यांवर पोलीस कारवाई करतात. काहींचे एन्काऊंटर केले जाते. तरी नक्षलवादी चळवळी सुरू कशा राहातात? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. त्यामागे शहरी माओवादी असून तेच या चळवळीचे अध्वर्यू आहेत. या चळवळीत कुणी कवी, साहित्यिक, वकील आणि न्यायाधीश म्हणून वावरत आहेत.”
*ऐका राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित शहरी नक्षलवादावर नेमकं काय म्हणाले?* https://t.co/ntXD5CqC8E — Praveen Dixit, (@PraveenDixitIPS) September 30, 2021
*ऐका राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित शहरी नक्षलवादावर नेमकं काय म्हणाले?* https://t.co/ntXD5CqC8E
— Praveen Dixit, (@PraveenDixitIPS) September 30, 2021
स्टॅन स्वामी नावाचा ऐंशी वर्षांचा नक्षलवादी होता. वय जास्त असले तरी त्याने उद्योग करण्याचे थांबवले नाही. न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला नाही आणि आजाराने तो गेला. पण, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टॅन स्वामी गेला आता इतर लोकांना सोडा असे अर्ज सुरू झाले.”
या व्यक्ती ‘राजकीय विरोधक’ असल्याचे म्हटले जाते. पण ते राजकीय नव्हे तर घटनेचे विरोधक आहेत. हे सर्व दबावतंत्र आहे. सामान्य माणूस त्याला फसतो. पण सरकार उगाचच त्यांना डांबून ठेवत आहेत. अशा प्रवृत्तींना विरोध करायला हवा, असे दीक्षित म्हणाले.
“एल्गार परिषद हा पहिलाच खटला नाही. यापूर्वी अनेक खटले झालेले आहेत. छत्तीसगढमध्ये गौतम सेन नावाचा प्राध्यापक होता, त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. साईबाबा नावाचा दिल्लीतला इंग्रजीचा प्राध्यापक होता. नक्षलवादी चळवळीला मार्गदर्शन करण्याचे काम तो करीत होता.
आजही हा साईबाबा शिक्षा भोगत आहे. एल्गार परिषदेच्या खटल्यात माध्यमांमध्ये त्यांच्या बाजूचा वकील काय बाजू मांडतो यालाच दुर्दैवाने माध्यमांमध्ये जास्त प्रसिद्धी दिली जाते,” अशी खंत दीक्षित यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App