विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मॅँव मॅँव केले म्हणून टीका करणाºया नबाब मलिकांची भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी खिल्ली उडविली आहे. नितेश राणे यांनी ट्विट केले आहे. त्याखाली त्यांनी एक फोटो आणि कॅप्शन देखील लिहले आहे. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते..ओळखा पाहू कोण? असे म्हटले आहे.This species is found only in debris, Nabab Malik ridiculed by Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘म्याव म्याव’ ला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कोंबडीच्या मीम ट्विट करत उत्तर दिले होते. त्या मीमला आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी ट्विटवर एक मीम शेअर केला असून, नवाब मलिकांच्याच स्टाईलने ओळखा पाहू कोण? असे कॅप्शन देखील दिले आहे.
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना भाजपकडून सभागृहाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येत होता. त्यावेळी आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना नितेश राणेंनी ‘म्याव म्याव’ अशा मांजरीच्या आवाजात आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली होती.
त्यावरुन शुक्रवारी नवाब मलिक यांनी मीम शेअर केले होते. त्या मीममध्ये कोंबडीच्या धडाला मांजराचे शीर लावण्यात आले होते, आणि ‘पहचान कोन’ असे म्हणत मलिकांनी राणेंची खिल्ली उडवली होती.
नितेश राणेंच्या या कृतीला नवाब मलिक यांनी उत्तर दिले होते. मलिक यांनी एक फोटो ट्विट केला. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्विट करत नितेश राणेंवर निशाणा होता. या फोटोकडे निट पाहिले तर शरीर कोंबडीचे आणि तोंड मांजरीचे असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच हा फोटो ट्विट करताना मलिक यांनी पहचान कौन? असा सवालही केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App