वृत्तसंस्था
मुंबई : “पवार साहेब मुख्यमंत्र्यांचा हा सुसंस्कृतपणा पाहिलात का?”, असा सवाल आज नारायण राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला.”This is the culture of Chief Minister, Have you seen? ”; Question by Narayan Rane Asked to Sharad Pawar
नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील कालच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना “मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” पवारांच्या या वक्तव्यावर नारायण राणे आज यांनी खरमरीत टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे यांच्या जुन्या भाषणातील विधाने वाचून दाखवली.
ते म्हणाले, “शिवसेनेने, शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द कधी उच्चारले नाहीत का? १ ऑगस्टच्या बीडीडी चाळीच्या कार्यक्रमाआधी आमच्या पक्षाचे प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाबद्दल वक्तव्य केले. तोडू वगैरे..आमच्या महिलांवर हात टाकला तर हे करु ते करु वगैरे,,,हात टाकला तर. त्यावर मुख्यमंत्री महाशय काय म्हणाले? ते असे म्हणाले, सेना भवनाबद्दल अशी कोण भाषा बोलेल त्याचं थोबाड फोडा. हा गुन्हा नाही?”
ते पुढे म्हणाले, “दुसरं एक वाक्य आहे योगी साहेबांबद्दल. हेच मुख्यमंत्री पूर्वी बोलले होते हा योगी आहे की ढोंगी? याला चपलेने मारले पाहिजे. अमित शाह यांच्याबद्दलचं उद्धव ठाकरे याचं वक्तव्यही ऐकवलं आणि म्हणाले, पवार साहेब, काय सज्जनपणा आहे, काय साळसपणा आहे?
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App