माझ्या मैत्रीचा, चांगुलपणाचा गैरफायदा घेतला; नारायण राणे यांची माध्यमे, पत्रकारांवर नाराजी


वृत्तसंस्था

मुंबई : काही लोकांनी माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेतला आहे, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. Union minister Narayan Rane slams media over coverage

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. रत्नागिरीवरून सकाळी साडेपाच वाजता मी मुंबईत पोचलो. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. याचा अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं आहे.१७ सप्टेंबरपर्यंत कोर्टाची केस असल्याने मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही. पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं योग्य वाटलं नाही. म्हणून पत्रकारांना दौऱ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे, असं राणेंनी सांगितलं.

घडामोडींवर लक्ष ठेवून होतो

माझ्या त्या पत्रकार परिषदेनंतर मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. काही जण माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा माझा गैरफायदा घेत असल्याचे माझ्या लक्षात आले आहे, असं राणे यांनी सांगितलं. तुमच्या चांगुलपणाचा कुणी गैरफायदा घेतला? असा सवाल राणेंना करण्यात आला.

त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी माझा गैरफायदा घेतला, असं स्पष्ट केलं. यावेळी राणेंना कोणते पत्रकार आहे त्यांचे नाव सांगा असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र, राणे केवळ हसले. त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

Union minister Narayan Rane slams media over coverage

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”